पुणे: पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कामावरून काढल्याचा रागातून दोन मजुरांनी बदला घेण्यासाठी ठेकेदाराच्या मुलीचा अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढवलं. पोलिसांनी काही तासातच तीन वर्षाच्या मुलीची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
काम व्यवस्थित करत नसल्याच्या कारणाने ठेकेदाराने झारखंड मधील दोन मजुरांना कामावरून काढून टाकले. कामावरून काढल्याचा राग मनात धरून दोघांनी बदला घेण्याचे ठरवले. दोन्ही मजुरांनी ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. सोमवारी त्यांनी अपहरण केले. बराच वेळ झाला तरी मुलगी घरात दिसत नाही म्हणून पालकांनी परिसरात शोधा शोध केली .पण शेवटी घाबरलेल्या पालकांनी पोलिसांना तक्रार केली. तसेच मजुरांवर संशय असल्याचेही बोलून दाखवलं.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने अधिक चौकशी करत शोध चालू केला. काम सोडून जाणाऱ्यांपैकी चौघेजण बिहार कडे चालले होते.ते इंद्रायणी एक्सप्रेस मधून तिला कुठेतरी घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजतात लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
रायझिंग’ टोळ्यांवर पोलिसांचा ‘क्लोज वॉच’; वाढत्या गुन्हेगारीवर कडक अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम
‘वरातीमागून घोडे’ ही म्हण तंतोतंत सध्यस्थितीत पुणे पोलिसांना लागू होत आहे. अलीकडच्या काळात गँगवार, हल्ले, खंडणी, ड्रग्सची तस्करी, आणि सोशल मीडियावरून गुन्हेगारीला मिळणारा प्रोत्साहनपर ठसा यामुळे गुन्हेगारीचं स्वरूप अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यानंतर आता पोलिसांनी गुन्हेगारांचा वाढलेला उन्माद अन् गुन्हेगारीचा आलेख उतरवण्यासाठी शहरातील ८८ रायझिंग टोळ्यांवर क्लोज वॉच ठेवण्यास सुरूवात केली असून, वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहरात प्रमुख टोळ्यांसोबत नव्याने तब्बल ८८ टोळ्या सक्रिय आहेत. ज्या पोलिसांच्या मते रायझिंग टोळ्या म्हणून ओळखल्या जात आहेत. प्रमुख टोळ्यांपेक्षा या टोळ्यांचा गेल्या काही वर्षात चांगलाच उन्माद वाढला आहे. सर्व सामान्यांवर दहशत माजवणे गोंधळ घालणे, वाहन तोडफोड करणे तसेच रात्री अपरात्री गोंधळ घालण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे पुण्याची शांतता ही भंग पावत चालल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांनी उटसूट लाव मोक्कामुळे टोळ्यांची संख्या तर आकडेवारीत भयावह झाली आहे. मोक्कात जेलमध्ये अन् त्यातूनच जामीनावर बाहेर आल्याने गल्ली-बोळातल्या गुन्हेगारांना देखील भाईच फिलींग येऊ लागले. त्यांनी भाईगिरीचा माज दाखवण्यास सुरूवात केली. त्यांच्यामुळे रस्त्यावरील रक्तरंजित खेळ व दहशतीचा माहोल आधीकच वाढल्याचे चित्र आहे.