बारामती: शहरातील सम्यक लाईफ स्टाईलचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर शनिवारी (दि १) एका कामगाराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आनंद छाजेड यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये खोलवर जखम झाली असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सम्यक दुकानातील एका कामगाराला छाजेड यांनी काम व्यवस्थित करत नसल्याने काही वर्षांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते. त्याने गेल्या दोन वर्षात त्यांच्या दुकानात जाऊन तोडफोड करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. बारामती शहर पोलिसांनी त्या वेळेस त्याला अटक करुन कारवाईही केली होती.
शनिवारी हातात दगड घेऊन संबंधित कामगार दुकानात घुसला, त्याने काचा फोडल्या. दुकानात उपस्थित असलेल्या आनंद छाजेड यांच्या अंगावर दगड घेत तो धावून गेला, त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दगड डोक्यात लागू नये म्हणून मागे सरकलेल्या आनंद यांच्या चेह-यावर दगड लागला, त्यांना आठ टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान या घटनेचा बारामती व्यापारी महासंघाने निषेध केला असून सोमवारी (ता. 9) सकाळी अकरा वाजता व्यापा-यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटून या बाबत निवेदन देणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. बारामती शहर पोलिसांनी संबंधित हल्लेखोरास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी महिलेला अटक
एक बांगलादेशी महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आली. मात्र, तेथील महिला पोलिस कर्मचार्याला संशय आल्याने त्यांनी याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती दिली आणि दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीत ती महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी घुसखोर महिलेला जेरबंद करण्यात आले आहे.
भारतीय व्यक्तीशी लग्न ते रिल्स स्टार; पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी महिलेला अटक
बांगलादेशी पासपोर्ट केला नष्ट
पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यात अनेक बांगलादेशी क्रमांक आढळले. तसेच, ती सोशल मीडिया आणि फोनद्वारे बांगलादेशातील लोकांशी संपर्कात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात तिचे जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचेही स्पष्ट झाले. तिच्या मोबाईलमध्ये हिंदुस्थानी मतदान कार्ड, पश्चिम बंगालमधील शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर कागदपत्रांच्या प्रती आढळल्या. तसेच, तिच्या ताब्यात हिंदुस्थानी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय पासपोर्ट देखील सापडला. विशेष म्हणजे, तिच्या मोबाईलमध्ये तिचा बांगलादेशी ओळखपत्र आणि पासपोर्टच्या प्रतीदेखील सापडल्या. संबंधित महिला २०१८ मध्ये एजंट महिलेच्या मदतीने बांगलादेशातून हिंदुस्थानात आली. हिंदुस्थानात आल्यानंतर तिने तिचा बांगलादेशी पासपोर्ट नष्ट केला.