
crime (फोटो सौजन्य: social media)
पोलीस तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्या की घातपात, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.
पोलीस बंदोबस्त वाढवला
लातूर शहरालगत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनी मृत मिळाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमरणात पालक इथे जमा झाले होते. काही पालकांनी विद्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे आरोप करत तक्रारी केल्या आहेत. अश्या वातावरणामुळे विध्यार्थी मानसिक तणावात राहत असल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विध्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे नवोदय विद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस तपासातून नेमके सत्य काय ते लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
घातपाताचा संशय
मृत विद्यार्थिनी अत्यंत हुशार आणि चुणचुणीत होती असे सांगिलतले जात आहे. मृत विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावातील रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्राथमिक माहितीनुसार, नवोदय विद्यालयातील अभ्यासाचा ताण आणि अतिरिक्त दबावामुळेच मृत विद्यार्थिनीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केला जात आहे.
Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले
Ans: लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात.
Ans: आत्महत्या की घातपात, याबाबत संशय असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Ans: पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले असून विद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.