crime (फोटो सौजन्य : social media)
राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीचं सत्र सुरु आहे. आता लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, विवेकानंद चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या किरकोळ उधारीमुळे घडलेल्या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
एकाशी लग्न, दुसऱ्यावर प्रेम, तिसऱ्याशी…..! प्रेम, धोका आणि मर्डर, एका प्रेमाची रक्तरंजित कहाणी
काय घडलं नेमकं?
पानटपरीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्याचा कारणावरून वाद होऊन या वादातूनच बाचाबाची झाली. आणि या बाचाबाचीचा रूपांतर मोठ्या वादात झाला. त्यानंतर आरोपींनी धारदार शास्त्र असलेल्या सुरा आणि कोयत्याने चौघांवर हल्ला केला. त्यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत यांनी दिली. ही घटना लातूरमधील बाभळगाव नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.किरकोळ उधारी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
वैष्णवीनंतर मयुरीने संपवले जीवन: ६ वर्षांच्या चिमुकल्यासह…
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. याघटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी याघटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत नर्सरीच्या वर्गाला शिकवत होती. तर पती शशिकांत हा एका बँकेत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आंबेगाव बुद्रुकमधील देशमुख कुटूंब कल्पक सृष्टी सोसायटी येथे राहण्यास होते. त्यांना विष्णु हा एक मुलगा होता. देशमुख कुटूंब मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात राहण्यास आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मयुरी हिने आपल्या ६ वर्षांच्या विष्णु या मुलासह पाचव्या मजल्यावर जाऊन टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी येथे धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.
मयुरीजवळ आढळली सुसाईड नोट
मयुरी हिने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. तिने एका पानावर नणंदेबाबत मजकूर लिहीला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नणंदेच्या त्रासामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, घरी कोणी नसताना हा प्रकार घडल्याचे समजते.
मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना