एकाशी लग्न, दुसऱ्यावर प्रेम, तिसऱ्याशी.....! एका प्रेमाची रक्तरंजित कहाणी
अलवर: राजस्थानमध्ये सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या हत्येसारखेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ९ वर्षांच्या मुलानेच या घटनेला वाचा फोडली आहे. आपल्या आईनेच वडिलांची हत्या केली आणि आपण स्वत: हे डोळ्यांनी पाहिल्याची मुलाने साक्ष दिली आहे. मुलाने दिलेल्या साक्षीनंतर अलवर पोलिसांनी आईला अटक केली आहे.ही घटना ७ जूनच्या रात्री राजस्थानातील अलवर येथील खेरली भागात घडली. या हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की या घटनेचे धागेदोरे उलगडण्यासाठी पोलिसांना सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करावे लागले.
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्याप्रमाणेच या हत्येची कहाणीही रंजक आहे. अनिता राज यांचे लग्न २०१० मध्ये भुसावर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील सुशिक्षित इंद्रमोहन जाटव यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार झाले होते. सर्व काही व्यवस्थित झाले आणि एका मुलाचा जन्मही झाला. काही वर्षांनी, तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांनी खेरली रेलमध्ये एक घर बांधले. अनिता राज तिच्या सासरच्यांसोबत राहू लागली. काही काळानंतर, अनिताचे तिच्या सासरच्यांशी भांडण होऊ लागले ज्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध छळाचा खटला दाखल केला आणि तिचा पती इंद्रमोहन त्याची पत्नी अनिता राजला पाठिंबा देत राहिला.
याचदरम्यान, इंद्रमोहनने जवळच एक घर भाड्याने घेतले आणि तो त्याच्या पत्नी आणि मुलासह राहू लागला. इंद्रमोहन फळे विकायचा आणि पत्नी आणि मुलासह आनंदी होता. दरम्यान, अनिता राजचे वीरू जाटवसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे आता अनिता इंद्रमोहन यांच्यातही वाद आणि भांडणे होऊ लागली. अनिता इंद्रमोहनला सोडून वीरू जाटवसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली, ज्यापासून विशाल नावाचा मुलगा झाला. त्यानंतर तिचे तिसरे प्रेमप्रकरण सुरू झाले ज्यापासून तिला तिसरा मुलगा झाला.
कथेत एक ट्विस्ट येतो कारण वीरू जाटव आधीच विवाहित होता आणि त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठी मुलगी सविता या वर्षी बारावी उत्तीर्ण झाली आहे. महिन्याभरापूर्वी, वीरूने त्याच्या मोठ्या मुलाचे लग्नही लावून दिले. वीरू जाटव यांनी पत्नी आणि मुलांची पूर्ण काळजी घेतली आणि त्यांचा खर्च उचलला, परंतु तो पत्नी अनिता राज आणि तिच्या मुलासोबत राहत होता. पहिली पत्नी सपनाने तिच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि तिचे आयुष्य जगण्यासाठी पतीचे दुसरे लग्न स्वीकारले होते.
काही काळानंतर अनिताचे काशी प्रजापतीशीही सुत जळाले. काशी प्रजापतीचे घर वीरू जाटवच्या कॉलनीतच आहे. काशी प्रजापतीही विवाहित आहे आणि तिला एक मुलगा आहे. इंद्रमोहन आणि वीरू जाटव यांच्यानंतर, अनिता राजने काशी प्रजापतीशीही गुप्तपणे प्रेमसंबंध निर्माण केले, परंतु आता तिचा दुसरा पती वीरू जाटव तिच्या नवीन प्रेमसंबंधात अडथळा आणत होता.
व्यवसाय करावा तर असा… लेकीचा वाढदिवसामुळे सुरु झाले लाखोंचे उत्पन्न!
अनिता आणि काशी यांनी मिळून वीरूला मारण्याची योजना आखली. ८ जून रोजी अनिता आणि काशी यांनी वीरूला मारण्यासाठी चार जणांना २ लाख रुपयांची सुपारी दिली. आणि त्यांनी वीरूची हत्या केली. पण अनिता आणि वीरूच्या मुलाने त्याची हत्या होताना पाहिले पण तो भीतीने शांत राहिला आणि हत्येच्या वेळी झोपल्याचे नाटक केले. अनिताने सुरुवातीला वीरचे आजापणामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. पण वीरूचे तुटलेले दात आणि गुदमरल्याच्या खुणा पाहिल्यानंतर लोकांना संशय आला. यानंतर, वीरूच्या भावाने तक्रार दाखल केली.
अनिता आणि वीरूच्या मुलाने आपल्या आईनेच वडिलांची हत्या केल्याची साक्ष दिली. आईने रात्री घराचा मुख्य दरवाजा जाणूनबुजून उघडा ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास, चार जण घरात घुसले आणि त्यांचे वडील वीरू झोपेत असताना त्यांचा गळा दाबून खून केला. तो त्या चौघांपैकी एका माणसाला ओळखतो. काशीराम प्रजापती असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस तपासात काशीराम हा अनिताचा प्रियकर असल्याचे समोर आले. कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी अनिता राज आणि काशी प्रजापती, ब्रिजेश जाट यांना अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली.