Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

भुशी गावातील हॉटेलच्या आवारात रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली आणि काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ३३ वर्षीय अभय मराठे यांच्या छातीत गोळी घुसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हा प्रकार नेमका अपघात होता की रायफलमध्ये गोळी लोड असण्यामागे काही वेगळे कारण होते, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आह.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 06, 2026 | 08:39 AM
वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

Follow Us
Follow Us:
  • भुशीतील ‘हॉटेल मोतीराम’च्या आवारात घडली घटना
  • वडिलांची परवानाधारक रायफल साफ करताना छातीत लागली गोळी
  • लोणावळा शहर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद; विविध शक्यतांचा तपास
 

लोणावळा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी गावात रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभय माणिक मराठे (वय ३३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भुशी गावासह लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हॉटेलच्या आवारात रायफल साफ करताना दुर्घटना

प्राथमिक माहितीनुसार, भुशी गावातील प्रसिद्ध ‘हॉटेल मोतीराम’च्या आवारात ही घटना घडली. अभय मराठे हे त्यांच्या वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफल साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने त्यातून गोळी सुटली. ही गोळी थेट अभय यांच्या छातीत लागली. गोळीचा आवाज होताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले

गोळी लागल्याने अभय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी त्यांना तातडीने लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, गोळी छातीत खोलवर लागल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी रुग्णालयात तसेच घटनास्थळी धाव घेतली.

अकस्मात मृत्यूची नोंद; पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परवानाधारक शस्त्र असतानाही रायफल साफ करताना आवश्यक सुरक्षा खबरदारी घेतली होती का, तसेच रायफलमध्ये गोळी लोड का होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हा प्रकार केवळ अपघात आहे की यामागे अन्य काही कारण आहे, या सर्व शक्यतांच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Lonavala bhushi rifle accident abhay marathe death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Accidendt
  • Accident Death
  • Lonavla
  • maharashtra news

संबंधित बातम्या

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
1

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

उत्तराखंडचा २२ वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता; मित्रांसोबत फिरायला गेला अन् परतलाच नाही
2

उत्तराखंडचा २२ वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता; मित्रांसोबत फिरायला गेला अन् परतलाच नाही

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
3

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
4

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.