भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई
पुणे : परदेशात राहणाऱ्या व्यक्तीच्या बंगल्यात शिरून पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतून १४ लाखांचे दागिने चोरुन पसार झालेल्या चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीची विट असा ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेसजवळ, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
तक्रारदार कुवेतमधील तेल कंपनीत वित्त विभागात कामाला आहेत. लोणी काळभोर भागातील तरडे परिसरात त्यांनी चार गुंठे जागा खरेदी करून बंगला बांधला होता. ते सुटी घेऊन लोणी काळभोरमधील बंगल्यात वर्षातून तीन ते चार वेळा वास्तव्यास येतात. त्यांनी बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यांनी बेडरूममधील पलंगाखाली एक तिजोरी केली आहे. या तिजोरीवर फरशी बसविली आहे. या तिजोरीत त्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची वीट ठेवली होती. १ फेब्रुवारी रोजी ते कुवेतहून पुण्यात आले. बंगल्यात पोहोचले. तेव्हा बंगल्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. पलंगाखाली असलेल्या तिजोरीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
नंतर लोणी काळभोर पोलिसांत तपास सुरू केला. ३१ जानेवारी रोजी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले. तपासात सराइत चोरटा संगतसिंग कल्याणी आणि साथीदाराने बंगल्यातून ऐवज चोरल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या कल्याणीला पकडले. चौकशीत कल्याणी याच्याकडून घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. संगतसिंगचा साथीदार पसार झाला आहे. त्याला बंगल्यातील तिजोरीची माहिती होती. त्याला अटक केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होईल, असे पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.