crime (फोटो सौजन्य: social media)
एका हिंदू मुलीने मुस्लिम युवकारावर प्रेम जाळ्यात अडकवुन धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. तक्रार दाखलकर्नी युवती २० वर्षांची आहे. आधी युवकाने हनुमान चालीसा आणि शिव स्रोत वाचून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत आहे. हा प्रकरण उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये घडली आहे. या प्रकरणी चिनहट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.
नेमकं काय घडलं?
२० वर्षीय तरुणीचा आरोप आहे, गावात राहणार मुस्लिम युवक राशीदने तिच्याशी मैत्री केली. सुरुवातीला त्याने तो हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्म मानतो असं सांगितलं. तिचा विश्वास जिंकण्यासाठी तो तिच्यासमोर हनुमान चालीसा आणि शिवस्त्रोत वाचायचा. त्यामुळे तिचा विश्वास वाढला. त्याच्या वागणुकीवरून तीला असं वाटलं की तो तिच्यावर खरं प्रेम करतो असं सांगितला.
काही काळाने राशीदने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तरुणीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. तरुणीने त्याला विरोध केला असता,त्यावेळी त्याने पैसे आणि परदेशात चांगलं आयुष्य मिळेल असं स्वप्न दाखवलं. राशीदने तिला सांगितलं की, सौदी अरेबिया आणि बांग्लादेशातत्याचे नातेवाईक राहतात. जर, मी इस्लाम स्वीकारला, तर आपण तिथे जाऊ, सर्व काही ठीक होईल असं राशीदने तरुणीला सांगितले. मात्र तरुणीने धर्म परिवर्तनाला नकार दिला. त्यानंतर राशीदने रस्त्यात युवतीला अडवून तिचा व्हिडीओ बनवला. एकदा फुलाचा पुष्पगुच्छ फेकून धमकावण्याचा प्रयत्न केला अनेकदा तिला तो त्रास द्याचा धमकी द्याचा. अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचा विचार यायचे.
तिने अनेक दिवस हा त्रास सहन केल्यानंतर हिम्मत एकवटून आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यांनतर नातेवाईकांनी चिनहट पोलीस ठाण्यात राशिद विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरु केला आहे.
यवतमाळ हादरलं! कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला सिलेंडर; जागीच मृत्यू
यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घृण हत्या केली. मृतकाचे नाव इंद्रकला विजय जयस्वाल (वय अंदाजे 38) असे आहे. आरोपी पतीचं नाव विजय जयस्वाल असं आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय जोमात; पोलिसांची ‘डोळेझाक’ कार्यपद्धत संशयात