काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील मृत चार वर्षाच्या मुलाचे नाव अर्णव असे आहे. तर त्याच्या आरोपी बापाचे नाव भीष्म खरबंदा असे आहे. भीष्म आणि कानपूरची स्वाती यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनिअल साइटच्या माध्यमातून झाला होता. लग्नाच्या एकवर्षांत अर्णवचा जन्म झाला. अर्णवच्या जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यांत स्वातीचा मृत्यू झाला.त्यांनतर अर्णवचा मामा रोहितने त्याला आपल्या घरी घेऊन आले. एका वर्षानंतर भीष्मने रागिणीशी दुसरे लग्न केले. रागिणीला पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती. नंतर भीष्म आणि रागिणीला एक वर्षाचा मुलगा आहे.
शस्त्रक्रिया व्हायच्या आधी इंजेक्शन दिले अन्…; कणकवलीमध्ये महिलेसोबत घडले तरी काय?
कोर्टाच्या आदेशाने घरी आणले आणि…
अर्णवची कस्टडीसाठी भीष्म याला पाहिजे होती.त्यासाठी कोर्टात खटला सुरु होता. कोटाच्या आदेशानुसार 13 ऑगस्ट 2023 रोजी भीष्म अर्णवला आपल्या घरी घेऊन आला. अर्णवचा पिता भीष्म याने मुलाला चांगले संगोपन देण्याचे कारण सांगून कोर्टाकडून कस्टडी मिळवली होती. मात्र एके दिवशी अर्णवचा मृत्यू झाला. “अर्णवची तब्येत बिघडली होती, त्याला उलट्या-जुलाब होत होते. तो बाथरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही. जाऊन पाहिले तर तो खाली पडला होता आणि त्याचा श्वास थांबला होता.” असे भीष्मने रोहितला फोन करुन सांगितले.
१८ जखमा, कित्येक हाडे मोडलेली…
मात्र मामा रोहितला भीष्मच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. जेव्हा त्याने घरी जाऊन अर्णवला पाहिले, तेव्हा त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जुन्या आणि नवीन जखमा स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या शरीरावर एकूण १८ जखमांच्या खुणा, कित्येक हाडे मोडलेली आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले.
अर्णवच्या मामाचे गंभीर आरोप
अर्णवच्या मामाच्या कुटुंबाने भीष्म आणि रागिणीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोर्टात असतानाही अर्णव खूप शांत आणि घाबरलेला असायचा. कोणाशीही बोलत नव्हता. भीष्म त्याला कोणाला भेटूही देत नव्हता. अनेकदा फोन केल्यावर तो व्हिडीओ कॉलवर फक्त अर्णव जवळ असल्याचे दाखवायचा, पण त्याचे बोलणे करून देत नव्हता आणि कॉल म्युट करायचा, अशी माहिती अर्णवच्या मामाच्या कुटुंबीयांनी सांगितली.
वडिलांकडे गेल्यानंतर अर्णव पूर्णपणे बदलला होता. शरीरावरील जखमा लपवण्यासाठी भर उन्हाळ्यातही बाप त्याला पूर्ण बाह्यांचे कपडे घालायला लावायचा. सावत्र आई आणि बाप दोघेही त्याला मारहाण करत असत. जेव्हा नातेवाईकांनी जखमांबद्दल विचारले, तेव्हा रागिणी काहीतरी खोटे कारण सांगून वेळ मारून न्यायची. अर्णवच्या मावशीने सांगितले की, त्यांच्या बहिणीचा (स्वाती) मृत्यूही योग्य उपचार न मिळाल्याने झाला होता.
स्वातीच्या बहिणीशी लग्न लावून देण्याची मागणी
अर्णवची आई स्वाती हीचा मृत्यू झाल्यानंतर भीष्मणे स्वातीच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. “ती अर्णवचा चांगला सांभाळ करेल,” असे कारण सांगून त्याने सासरच्यांवर दबाव टाकला होता. पण सासरच्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. कारण त्यांनी आपली मुलगी स्वाती गमावली होती.
नातवाला भेटण्यासाठी आजी व्याकुळ
कस्टडी मिळाल्यानंतर भीष्मने अर्णवला त्याच्या आजी-आजोबांपासून पूर्णपणे तोडले होते. त्याची वृद्ध आजी आपल्या नातवाला भेटण्यासाठी व्याकुळ होती. अनेकदा त्या कानपूरहून लखनौला आल्या, पण भीष्मने त्यांना लांबूनच अर्णवला दाखवून परत पाठवले.
आरोपींना अटक
या प्रकरणात लखनऊ पोलिसांनी वडील भीष्म खरबंदा आणि सावत्र आई रागिणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. आता त्यांनी हत्या कशी केली, का केली आणि कस्टडी मागितल्यावर असं काय घडलं जे जन्मदात्या बापानेच अमानुष छळ केला? याची चौकशी पोलीस करत आहे. आता या प्रकरणात काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: ही घटना लखनौ मधील चौक परिसरात घडली.
Ans: पोस्टमार्टेममध्ये अर्णवच्या शरीरावर 18 जखमा, हाडे मोडलेली आणि गळा दाबून हत्या झाल्याचे समोर आले.
Ans: पोलिसांनी वडील भीष्म खरबंदा आणि सावत्र आई रागिणी यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.






