Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

लखनऊमध्ये पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. रोटी बनवण्याच्या तव्याने डोक्यावर वार केल्याने ऑटोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 02:52 PM
घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या आशीषचा तपस्यासोबत वाद झाला.
  • वाद वाढल्यानंतर डोक्यावर तव्याने वार केल्याचा आरोप.
  • गंभीर जखमी आशीषचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रोटी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तव्याने डोक्यावर वार केल्याने एका ऑटोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, दोघांचा घटस्फोट झाला होता की नाही, यावरून मृताच्या कुटुंबीय आणि आरोपी महिलेच्या दाव्यांमध्ये विरोधाभास आहे.

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

मुलीला भेटण्यासाठी गेला अन् वाद झाला

मिळालेल्या माहितीनुसार, आशीष सोनी हा ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून पत्नी तपस्या उर्फ प्रीतीपासून वेगळा राहत होता. दोघांना एक मुलगी असून तिला भेटण्यासाठी आशीष १३ ऑगस्ट रोजी कौशल्या गार्डन परिसरातील तपस्याच्या घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर तपस्याने स्वयंपाकघरातील तव्याने आशीषच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आशीष गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी केजीएमयू रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच जानकीपुरम पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपस्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत असून हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

घटस्फोट झाला होता का?

या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आशीष आणि तपस्या यांचा घटस्फोट झाला होता की नाही. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही विभक्त झाले होते आणि त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे आशीषची आई मीरा सोनी यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाल्याचे कोणतेही कागदपत्र कुटुंबाकडे नाही.

सासूचे गंभीर आरोप

आशीषच्या आईने तपस्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. तपस्या वारंवार आशीषला पैसे मागत असे आणि पैसे न दिल्यास त्याच्यावर खोट्या प्रकरणात कारवाई करण्याची धमकी देत असे, असा त्यांचा दावा आहे. यापूर्वीही तिने तक्रार केल्यामुळे आशीषचा ऑटो काही काळ बंद होता आणि त्याला कर्ज घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

हत्येच्या कटाचाही आरोप

आशीषच्या आईने तपस्यासोबत आणखी काही जणांचा या घटनेत सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तपस्याने काही साथीदारांसोबत मिळून आशीषविरोधात कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, या आरोपांना अद्याप पोलिसांच्या तपासातून दुजोरा मिळालेला नाही.

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

पोलिसांकडून सर्व बाजूंचा तपास

मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आशीष आणि तपस्या यांच्यातील जुना वाद, घटनेच्या दिवशी नेमके काय घडले आणि करण्यात आलेले इतर आरोप या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

 

Web Title: Lucknow wife attacks ex husband with roti tawa after domestic dispute man dies during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
2

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
4

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.