
क्रुरतेची पराकाष्ठा! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर
अल्पवयीन मुलीसोबत क्रुर कृत्य
ही घटना शिवपूरी जिल्ह्याच्या जिल्ह्यातील पिछोरे तालुक्यात, भाउती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदावली गावात घडल्याची माहिती आहे. इथे एका सनकी आशिकने रागाच्या भरात १७ वर्षीय किशोरवयीन मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. इतकं करुनही जेव्हा त्याच मन भरलं नाही तेव्हा त्याने तिचे शरीर दोरीला बांधून छतावर लटकवून टाकले. संपूर्ण घटना भितीदायक असून यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात घटनेतील काही दृष्ये दिसून आली. व्हिडिओमध्ये आरोपी रश्शीच्या मदतीने किशोरवयीन मुलीला छतावर लटकवताना दिसला. मुलगी रक्तीने माखली होती आणि हे दृष्ये पाहून सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पिडित किशोरवयीन मुलीला डोक्यावर, चेहऱ्यावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असून डाॅक्टरांच्या मते, तिची प्रकृती फार नाजूक आहे.
आरोपीला घेतलं ताब्यात
पोलिसांनी मुख्य आरोपी धर्मेंद्र परिहारला ताब्याच घेतलं आहे. या गुन्ह्यावेळी आरोपीसोबत त्याचे काही साथीदाार देखील समील असल्याची शंका प्राथमित तपासात वर्तवली जात आहे. पोलिस सर्व बाजूंनी घटनेचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पिडित मुलीच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केल्याची माहिती आहे. त्यांनी रस्ता अडवून निषेध नोंदवला आणि आरोपीचे बेकायदेशीर घर पाडण्याची मागणी केली. कुटुंबाचे म्हणणे आहे की, आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात दुसऱ्या मुलीसोबत अशी घटना होऊ नये.