(फोटो सौजन्य: X)
फेज ११ मधील बेस्टेक मॉल (सेक्टर ६६) जवळील एका खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या ३० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडून आला. मुख्य म्हणजे यावेळी ती आपल्या ऑफीसमध्ये काम करत होती. आरोपी ऑफीसमध्ये घुसला आणि त्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या देखत महिलेवर अनेकदा चाकूने वार केले. सांगण्यात येत आहे की, आरोपीने त्याच चाकूने स्वतःवर वारंवार वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेला डाॅक्टरांनी मृत घोषित केले आहे तर आरोपीची प्रकृती गंभीर आहे.
१५.१५ लाख कोटींचा घोटाळा हर्षद मेहताचा बाप निघाला राजेश मेहता
६ महिन्यांआधी झाल ब्रेकअप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख डिंपल (30 वर्ष) अशी आहे तर आरोपीची ओळख हरविंदर सिंह मान उर्फ हैरी (34 वर्ष) अशी पटली आहे. हे दोघं मागील तीन वर्षांपासून मोहालीच्या फेज ११ मधील एका पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीत सहकारी म्हणून काम करत होते. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते परंतु मागील सहा महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर हरविंदर मानसिकदृष्ट्या खचून गेला होता, तो डिंपलवर नातं पुन्हा सुरु करण्यासाठी दबाव टाकत होता. दुसरीकडे डिंपल मात्र पुन्हा नातं सुरु करण्यासाठी नकार देत होती, तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संतापलेल्या हरविंदरने तिच्या हत्येचा कट रचला.
Punjab – Shocking incident in Mohali The boyfriend (Harjinder Singh) – after his girlfriend (Dimple) said break up with him after 3 years of love – He attacked and killed her with a knife in the office where they both worked together Later, the young man injured himself with… pic.twitter.com/33A7OZkNWx — AP Observer (@APS_Observer) June 5, 2026
सीसीटिव्ही फुटेज समोर
या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता समोर आले आहे ज्यात घटना कशी घडली याचे संपूर्ण दृष्य स्पष्टपणे पाहता येते. गुरुवार संध्याकाळी डिंपल नेहमीप्रमाणे आपल्या डेस्कवर शांत बसली होती. यावेळीच मागून हरविंदर तिच्या जवळ आला, त्यांच्या वाद झाला आणि हरविंदरने चाकू बाहेर काढला. बचावासाठी डिंपलने तिथून पळ काढला पण दरवाजाजवळच हरविंदरने तिला पकडून ठेवले. यादरम्यान ऑफीसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी हरविंदरला समजवण्याचा, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण चाकूच्या भितीने कुणीही त्याच्या जवळ जाऊ शकलं नाही. व्हिडिओत दरवाजाजवळच हरविंदर सर्वांसमोर डिंपलवर चाकूने वार करताना दिसतो. दरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आता ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.






