Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना

Crime news in Marathi: आज 05 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2025 | 06:53 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

बीडच्या केज तालुक्यातील डोका गावामध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबीता भांगे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणात झालेली केस मागे का घेत नाही? या कारणातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

The liveblog has ended.
  • 05 Jul 2025 06:46 PM (IST)

    05 Jul 2025 06:46 PM (IST)

    भिसे टोळीच्या दोघांना शहरातून केले तडीपार

    साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा शहरांमध्ये सातत्याने वेगवेगळे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अविनाश राजाराम भिसे (वय २५, रा. प्रतापसिंहनगर), रोहित जितेंद्र भोसले (वय २२, रा. प्रतापसिंहनगर) अशी दोघांची नावे आहेत. हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी हे आदेश दिले. भिसे हा टोळी प्रमुख असून, त्याचा सहकारी रोहित भोसले यांनी सातत्याने सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता.

  • 05 Jul 2025 05:54 PM (IST)

    05 Jul 2025 05:54 PM (IST)

    पुणे-सातारा रस्त्यावर भीषण अपघात

    पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीस्वार जेधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून, हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.

  • 05 Jul 2025 05:42 PM (IST)

    05 Jul 2025 05:42 PM (IST)

    वनविभागाची मोठी कारवाई

    भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या पिसांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीवर पुणे वनविभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली आहे. नरपतगिरी चौक सोमवार पेठ परिसरात उत्तरप्रदेशातून आलेल्या ११ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील तब्बल ४०० ते ५०० किलो वजनाची मोरपिसे आणि त्यांच्यापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 05 Jul 2025 04:22 PM (IST)

    05 Jul 2025 04:22 PM (IST)

    ठाण्यात गुन्हेशाखेकडून 37 लाखाचा गांजा जप्त

    गांजा विक्रीसाठी आलेल्या ३आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक करून, 37 लाखाचा गांजा जप्त केला आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारतर्फे माहिती मिळाली की भिवंडी या ठिकाणी इसम नामे फैजल अकबर अन्सारी गांजा हा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी अब्दुल रहमान अन्सारी याला विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर सखोल तपास करुन गुन्हेशाखेने गांजा जप्त करत आरोपींना अटक केली आहे.

     

  • 05 Jul 2025 04:17 PM (IST)

    05 Jul 2025 04:17 PM (IST)

    कामगाराने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन केला खून

    खेड (ता. सातारा) येथे भंगार दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होऊन झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथ दगडू पवार (वय ६०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. संशयित जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुकाराम वैजनाथ पवार (वय ४०, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत नानाजी कांबळे (वय ३२, रा. गडकर आळी, शाहूपुरी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते भंगार दुकान मालक आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून शुक्रवारी पहाटे समोर आली आहे.

  • 05 Jul 2025 03:09 PM (IST)

    05 Jul 2025 03:09 PM (IST)

    टाईल्सच्या दुकानातून चोरी

    सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणंद- सातारा रस्त्यावरील लोणंद गोटेमाळ येथील सम्राट टाईल्स या दुकानातील एक लाख सत्तेचाळीस हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची फिर्याद सम्राट टाईल्सचे मालक कपिल जाधव यांनी लोणंद पोलीसांत दिली होती. याप्रकरणी लोणंद पोलीसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

  • 05 Jul 2025 02:57 PM (IST)

    05 Jul 2025 02:57 PM (IST)

    : जुन्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला

    पुरंदर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाल्हे (ता. पुरंदर) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश जगन्नाथ भुजबळ (रा. वरचा मळा, वाल्हे, ता. पुरंदर) याने दोघांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपी गणेश भुजबळ याला अटक केली आहे.

  • 05 Jul 2025 01:55 PM (IST)

    05 Jul 2025 01:55 PM (IST)

    येणेगुर येथील एका विद्यालयातील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा

    धाराशिव: जिल्ह्यातील येणेगूर येथील एका शाळेतील २९ विध्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास. या विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा समोर आला आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यात सर्वाधिक मुली आहेत. हा प्रकार नेमकं दूषित पाण्यातून झाला की अन्नातून, याचा आरोग्य विभागाकडून तपास सुरु आहे. ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समोर येईल. सर्व विध्यार्थीयांची प्रकृती स्थित असून शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात ही घटना घडली.

  • 05 Jul 2025 01:37 PM (IST)

    05 Jul 2025 01:37 PM (IST)

    दिव्यांगाचा गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार

    गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही जास्त आहेत. असे असताना आता केज तालुक्यात गतिमंद तरुणीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर गावातील तरुणांनी काही वेळातच पळून गेलेल्या नराधम आरोपीस पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. नराधम हाही दिव्यांग आहे. एक 25 वर्षांची गतिमंद तरुणी ही तिच्या भावजयीसोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात जात असताना त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोठ्यात थांबली होती. तिची भावजय ही जवळच असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गेली होती. त्याचा गैरफायदा घेत आणि पाळत ठेवून गतिमंद तरुणी एकटीच असल्याची संधी साधून नानासाहेब भानुदास चौरे या नराधमाने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली.

  • 05 Jul 2025 01:25 PM (IST)

    05 Jul 2025 01:25 PM (IST)

    रस्त्यात हळद-कुंकू टाकून कोंबड्याचा बळी; NCPच्या माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

    बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. परळी शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात मधोमध हळद कुंकू लिंबू टाकून कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी भर दुपारी घडली आहे. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत हा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराची शहरभर चर्चा झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्र घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठलं आणि कारवाईची मागणी केली आहे.

  • 05 Jul 2025 01:10 PM (IST)

    05 Jul 2025 01:10 PM (IST)

    Beed Crime: केस मागे का घेत नाही? म्हणत महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

    बीडच्या केज तालुक्यातील डोका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव बबीता भांगे असे आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण जुन्या भांडण्यात झालेली मागे घेण्यावरून झाली असल्याचे समोर आले आहे.

  • 05 Jul 2025 01:08 PM (IST)

    05 Jul 2025 01:08 PM (IST)

    गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक

    पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे प्रकार सुरूच असून, त्यातच शेअर मार्केटमधील गुंतवुणकीच्या बहाण्याने दोघांना तब्बल ४६ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्हॉट्अ‍ॅप ग्रुपमध्ये महिलेला अ‍ॅड करून तिला शेअर मार्केटमध्ये गुुंतवणुक करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या खात्यात तब्बल २९ लाख ७ हजार भरण्यास सांगितले. त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणार्‍या महिलेनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २१ एप्रिल २०२५ ते २० जून २०२५ दरम्यान घडला आहे. दुसर्‍या गुन्ह्यात शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने व चांगला परतावा मिळेल असे अमीष दाखवून एकाची १६ लाख ९७ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय खराडी येथील तक्रारदाराने तक्रार दिली आहे. हा प्रकार २३ मार्च २०२५ ते ८ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन घडला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे.

  • 05 Jul 2025 12:58 PM (IST)

    05 Jul 2025 12:58 PM (IST)

    व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या

    वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडीओ चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका ४० वर्षीय विवाहित महिलेले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी २ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  • 05 Jul 2025 11:51 AM (IST)

    05 Jul 2025 11:51 AM (IST)

    'तो' कुरिअर बॉय नव्हे तिचा मित्रच!

    कोंढवा येथील उच्चभ्रु सोसायटीत घडलेल्या आयटी अभियंत्या तरुणीवरील अत्याचारप्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, 'तो' कुरिअर बॉय नव्हता तर तिचा मित्रच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच तो घरात घुसला नसून, तो तिच्या सहमतीने घरी आला होता. तसेच, तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारलेला नसून, ती बेशुद्ध देखील झाली नव्हती, असेही समोर आले आहे. दरम्यान, तरुणीने नकार दिल्यानंतर देखील जबरदस्तीने बलात्कार केला, त्याचा तपास पुणे पोलिसाकंडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • 05 Jul 2025 11:20 AM (IST)

    05 Jul 2025 11:20 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बस्थानकात गोळीबार

    जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे बस्थानकात परिसरात शुक्रवारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश मोरे (३२, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण त्याच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पाचोरा बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आला होता. त्याच वेळी भरधाव दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर १२ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आकाशच जागीच मृत्यू झाला.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates 23

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • crime news

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
3

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
4

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.