Crime News Live Updates
पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडलीय. या प्रकारामुळ 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.
12 Jul 2025 03:50 PM (IST)
मुंब्रात डोंगराळ भागात फिरत असताना एका डॅममध्ये बुडाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. धक्कादायक (Mumbai News) बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतले. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी मित्रांची चौकशी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.हे सर्व मित्र शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र शाळेत न जाता ते मुंब्रातील डोंगराळ भागात फिरायला गेले होते. यावेळी डॅमजवळ अहद अन्सारी हा 14 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला.
12 Jul 2025 03:46 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी पुणे न्यायालयात मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल बदनामीप्रकरणातील खटल्यात दोषी नसल्याचा दावा गांधींच्या वकिलांनी केला आहे.
12 Jul 2025 03:36 PM (IST)
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेत रस्त्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आले आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचं नाव प्रकाश काशीद असं आहे.
12 Jul 2025 03:03 PM (IST)
जळगाव : शहरातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कदायक म्हणजे हा प्रकार सात दिवसांनी उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून सहकारी मुलींकडूनच मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
12 Jul 2025 02:04 PM (IST)
नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम समूहाची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक समोर आलं आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी हल्दीराम समूहाला त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे आणि त्या कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत ही फसवणूक केली आहे. आरोपींचे नावे समीर अब्दुल हुसेन लालानी, त्याची पत्नी हिना समीर लालानी, मुलगा आलिशान समीर लालानी, आणि भागीदार प्रकाश भोसले असे आहे.
12 Jul 2025 01:26 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथील गट नंबर 37 ला घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अर्जुन रतन प्रधान असे आहे.
12 Jul 2025 01:11 PM (IST)
लष्कर परिसरातील एका हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या कुटूंबाला देण्यात आलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांकडून संबंधित हॉटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी रवी शिरसाठ (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Jul 2025 12:40 PM (IST)
अकोला: एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दारूच्या नशेत एसटी बुसीमधील चालकाने आणि वाहनाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडली आहे. पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बस मध्ये हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे.
12 Jul 2025 11:49 AM (IST)
राज्यात फसवणुकीच्या घटनामध्ये वाढ झाली असून, पुणे शहरात सायबर फसवणूकीसह शेअर मार्केट तसेच कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या ५ घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये जादा परताव्याचे आमिष तसेच सुविधा बंद करण्याची धमकी देऊन ही फसवणूक केली आहे.
12 Jul 2025 11:37 AM (IST)
पुण्यातील कल्याणीनगर येथील एका मद्य विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने गल्ल्यातील १५ हजारांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर मद्याच्या बाटल्या फोडून नुकसान केल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी सचिन अंगदराव मुसळे (वय ३१, रा. आदर्शनगर ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Jul 2025 11:19 AM (IST)
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगलांचा मृत्यूदेह सापडला. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांचे तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती. तरुणी ही १६ वर्षांची असून तरुणाचा नाव संतोष कळसाईत असे आहे. हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती आहे.
12 Jul 2025 11:18 AM (IST)
नाशिक: फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर.
12 Jul 2025 11:17 AM (IST)
नायगाव: नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोसायटीत बँडमिंटन खेळात असतांना एका मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आकाश संतोष साहू आहे. या घटनेने साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
12 Jul 2025 11:17 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीर आणि भावजयीचे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीर आणि भावजयीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी महिला गेली असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून मारत होती. पण हा त्रिशूळ नवऱ्याला न लागता बाळाच्या डोक्यात घुसला. या घटनेत ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
12 Jul 2025 11:13 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
12 Jul 2025 11:06 AM (IST)
कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलिस ठाण्याने बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाणदार पान शॉप (ईगल चौक) येथून सलीम गनी बाणदार यांच्याकडून माव्याच्या ४२ पुड्या आणि ८४० रुपये जप्त करण्यात आले. राधे पान शॉप (माळभाग) येथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून ३८ माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारी आणि १६६० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना मावा उत्पादने खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती. यासंबंधी पोलिस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्यादी दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.