Crime News Live Updates
बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाईत घडली आहे. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यानंतर बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
02 Sep 2025 04:20 PM (IST)
राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात आमिषे दाखवून चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी पोलिसही वेळोवेळी आवाहन करत असले तरीही नागरिक फसवणुकीला बळी पडत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात एका 52 वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
02 Sep 2025 04:00 PM (IST)
बँकॉकमधून पुण्यात होणार्या कोट्यवधी रूपयांच्या गांजा तस्करीचे रॅकेट कस्टम विभागाच्या गुप्तचार विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट) उघड केले. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून प्रवाशांकडून तब्बल १३ किलो ७२२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात मुंबई, ठाणे, वलसाड आणि पालघर येथील चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजाची २६ पाकीटे जप्त करण्यात आली आहेत.
02 Sep 2025 03:40 PM (IST)
ऑनलाइन ट्रेडिंग आणि हॉटेल रेटिंगच्या नावाखाली नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून धायरीतील एका व्यक्तीची सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही फसवणूक २६ मे २०२५ ते सात जून २०२५ या कालावधीत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरीतील मल्हार सोसायटीत राहण्यास आहेत. आरोपींनी तक्रारदाराला संपर्क साधला. ऑनलाइन लिंकद्वारे हॉटेलला रेटिंग देणे आणि ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. नंतर मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधून यू पीआय आयडीवर रक्कम भरायला लावली. अशा प्रकारे एकूण तीन लाख २७ हजार रुपये आरोपींनी घेतले आणि तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली.
02 Sep 2025 03:20 PM (IST)
शिरोळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत २४ जनावरे दाटीवाटीने व क्रूरतेने वाहनात कोंबून नेली जात असताना रंगेहाथ पकडण्यात आली. ही कारवाई १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शिरटी ते शिरोळ मार्गावर भालचंद्र कुलकर्णी यांच्या उसाच्या शेताजवळ करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संदीप कृष्णा रानमाळे, नियुक्ती शिरोळ पोलिस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दूल इकबाल बागवान (वय ४७, रा. साइनगर, शिरोळ) व सलीम रफीक बेपारी (वय ३२, रा. बेघर वसाहत, शिरोळ) यांनी टाटा कंपनीची एस. गोल्ड वाहन (क्र. MH-09-EM-६२६७) मधून बेकायदा व परवाना नसताना जनावरांची वाहतूक केली.
या वाहनातून १४ एच.एफ. जातीचे नर पाडे, २ मादी पाड्या व ८ म्हैस जातीचे रेडकू अशी एकूण २४ जनावरे दाटीवाटीने कोंबण्यात आली होती. यामध्ये एका म्हशीचे रेडकू मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणी भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा १९६० तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काळे करत आहेत.
02 Sep 2025 02:46 PM (IST)
उल्लासनगरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपीने रिक्षा थांबवून फिर्यादीला किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवता फिर्यादी व त्याच्या साथीदाराकडून तब्बल २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटली आहे.
02 Sep 2025 02:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदनवन कॉलोनी या उच्चभ्रू सोसायटीतील आपारमेंटच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होते. या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका पीडित महिलेची सुटका करून आंटीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिनाज उस्मान बेग वय ४५ असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
02 Sep 2025 02:00 PM (IST)
नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदराने गळ्याला दोर लावतात आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव पीव्ही वर्मा असे आहे. वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
02 Sep 2025 01:40 PM (IST)
बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. परळी रेल्वे स्थानकात अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (31 ऑगस्ट) रोजी दुपारी घडली आहे. पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.
02 Sep 2025 01:30 PM (IST)
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून ‘हनी ट्रॅप’ चा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका ५२ वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत एकूण 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी जोडप्याला पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
02 Sep 2025 01:02 PM (IST)
पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत असून, पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. संतोष प्रल्हाद कांबळे (वय ३९, रा. कवडगाव, अहिल्यानगर) आणि सुदर्शन गोरख पुलावळे (वय ३८, रा. उरूळी देवाची) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. सिमेंट मिक्सर चालक नागेश नाना कोरके (वय ३०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Sep 2025 12:40 PM (IST)
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी आखली होती. मध्यरात्री गेम वाजविण्याचा कट रविवारी रचला गेला होता. मात्र, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉच ठेवणाऱ्याला रंगेहात पकडताच संपूर्ण प्लॅनच उधळून लावला. त्यामुळे रक्ताच्या बदल्यात रक्त घेण्याचा डाव थांबला असला, तरी सुत्रधार अजूनही बेपत्ता असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
02 Sep 2025 12:20 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकताच माजी नगरसेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर शहरात मोठी दहशत पसरली होती. अखेर पोलिसांनी या हल्ला प्रकरणातील तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
02 Sep 2025 12:10 PM (IST)
सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सहपरिवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.
02 Sep 2025 12:05 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला हजारो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्यासाठी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. “लवकरात लवकर मैदान खाली करा,” असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, “मेलो तरी मागे हटणार नाही,” असा ठाम पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
02 Sep 2025 12:00 PM (IST)
तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
02 Sep 2025 11:40 AM (IST)
जीवनसाथी मेट्रोमिनी साईटवरून झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडूनच दोन लाख रुपये उकळल्याचाही प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
02 Sep 2025 11:30 AM (IST)
मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शांतता मार्गे आंदोलन करत आहोत. कायद्याच्या चाैकटीत राहून आमचे आंदोलन सुरू आहे. कोर्ट हे आंदोलनाच्या बाजूने न्याय करेल, अशी आशा आम्हाला आहे. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहने हटवली आहेत. आता मुंबईत कुठेही वाहतूककोंडी नाहीये. आम्हाला 100 टक्के न्याय मिळणार आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असे मत जरांगे पाटलांनी व्यक्त केले आहे.
02 Sep 2025 11:20 AM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरट्यांकडून पोलिसांच्या हाती न लागण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. वानवडीत एका चोरी प्रकरणात देखील चोरट्यांनी महिलांसारखा वेश परिधान करून शक्कल लढवली खरी, पण पोलिसांनी त्यांना पकडलेच. रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील कंपनीतून दोन लाखांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरून नेला होता. सीसीटीव्ही व खबरऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आला. अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वानवडी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने, गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस कर्मचारी अमोल पिलाणे यांनी केली आहे.
02 Sep 2025 10:58 AM (IST)
प्रेमसंबंध तोडल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पिस्तूल लॉक झाले आणि गोळी झाडलीच न गेल्याने प्रेयसी बचावली होती. याप्रकरणात पसार झालेल्या प्रियकराला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली आहेत. खडकी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गौरव महेश नायडू (वय २५, रा. श्रीरंग रेसीडन्सी, गायकवाडनगर, पुनावळे, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.