Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : जळगाव हादरलं! माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 01 - 09- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2025 | 05:15 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकताच माजी नगरसेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर शहरात मोठी दहशत पसरली होती. अखेर पोलिसांनी या हल्ला प्रकरणातील तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

The liveblog has ended.
  • 01 Sep 2025 05:01 PM (IST)

    01 Sep 2025 05:01 PM (IST)

    शिरुरच्या हॉस्पीटलमध्ये महिलेचा विनयभंग

    शिरुर शहरातील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये महिला तिच्या पतीला उपचारासाठी घेऊन आलेली असताना पोपट सालके हा महिलेचा मोबाईल घेऊन हॉस्पिटलखाली आल्याने महिला मोबाईल घेण्यासाठी आल्यानंतर पोपट याने महिलेचा हात पकडून महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत पिडीत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पोपट जयराम सालके रा. जवळा ता. पारनेर जि. अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहेत.

  • 01 Sep 2025 04:50 PM (IST)

    01 Sep 2025 04:50 PM (IST)

    ‘एसआरए’ प्रकल्पात बांधकाम मजुराचा मृत्यू

    पर्वती दर्शन परिसरात नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारतीत काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. गेंदमाई रघुराई साकेत (वय २९, मूळ रा. कुचवाही, जि. सिधी, मध्य प्रदेश ) असे मृत्यू झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साकेत याच्या भावाने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ठेकेदारासह सुरक्षाविषयक पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 01 Sep 2025 04:40 PM (IST)

    01 Sep 2025 04:40 PM (IST)

    नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

     

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात नेरुर-देसाईवाडा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आला असला तरी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्याला साईडपट्टी आणि गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट वाडीत शिरत असून त्यामुळे नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठांना, मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • 01 Sep 2025 04:20 PM (IST)

    01 Sep 2025 04:20 PM (IST)

    तरुणाच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या

    तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • 01 Sep 2025 04:00 PM (IST)

    01 Sep 2025 04:00 PM (IST)

    सराइताकडून १० किलो गांजा जप्त

    अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटककरून कारागृहात पाठवलेल्या गुन्हेगारांना जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर पुन्हा गांजा विक्री सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचा दहा किलो गांजा जप्त केला. प्रसाद गणेश हारपुडे (वय २५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

  • 01 Sep 2025 03:40 PM (IST)

    01 Sep 2025 03:40 PM (IST)

    बसमध्ये अल्पवयीन मुलीच्या सोन्याच्या रिंगा चोरी

    हडपसर वाघोली असा बस प्रवासा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा चोरी नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. शनिवारी (दि३० ऑगस्ट) दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. तिला हा प्रकार लक्षात येताच तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Sep 2025 03:20 PM (IST)

    01 Sep 2025 03:20 PM (IST)

    वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की

    भरधाव गाडी चालवल्यानंतर सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस अमंलदारांनाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. पाच जणांनी वाद घालत धक्काबुक्की केली. याप्रकरणी ज्ञानेर्‍वर सुंदर नटकले (२६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, सर्व रा. भिमनगर, विश्रांतवाडी), सिध्दी कांबळे (वय २४, रा. साप्रस आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि हर्षल भोसले (२५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरज बापुराव रणसिंग (वय ३२, रा. घोरपडी बाजार) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

  • 01 Sep 2025 03:00 PM (IST)

    01 Sep 2025 03:00 PM (IST)

    बनावट सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात १०.३३ लाखांचा हार घेऊन भामटा पसार

    डोंबिवली येथून एक फसवणुकीची मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोनाच्या नाण्यांच्या बदल्यात तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार घेऊन आरोपी पसार झाला आहे. यामुळे दुकानदाराला लाखोंचा गंडा घातला गेला आहे. ही घटना डोंबिवली पूर्वमधील टिळक रस्त्यावर असलेल्या श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

  • 01 Sep 2025 02:20 PM (IST)

    01 Sep 2025 02:20 PM (IST)

    MIM नेत्याला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक

    मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे. तो एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा तो कट्टर समर्थक मानला जातो. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 01 Sep 2025 02:17 PM (IST)

    01 Sep 2025 02:17 PM (IST)

    India Rain Alert: पंजाबमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; ‘या’ राज्यांना आज पाऊस झोडपणार

    Heavy Rain Update: गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 01 Sep 2025 02:00 PM (IST)

    01 Sep 2025 02:00 PM (IST)

    मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना मारहाण

    धुळे येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात सर्वांसमोर दोन पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलिसांना मारताना एक तरुण दिसत आहे.

  • 01 Sep 2025 01:40 PM (IST)

    01 Sep 2025 01:40 PM (IST)

    तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू

    सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील लोकांनी झोपण्याआधी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. सकाळी जाग आली तर धक्कादायक दृश्य समोर आला आहे. कुटुंबातील दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला. याशिवाय पत्नी आणि आईसह त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.

  • 01 Sep 2025 01:20 PM (IST)

    01 Sep 2025 01:20 PM (IST)

    महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती

    त्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराज असल्याचे सोंग घेत चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याची कुणकुण लागताच पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य संशयित ‘गोट्या महाराज’ उर्फ परमेश्वरानंद हा पसार झाला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

  • 01 Sep 2025 12:55 PM (IST)

    01 Sep 2025 12:55 PM (IST)

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर अत्याचार करणार्‍याला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. अथर्व विजय गुडेकर (१९, रा. स्वप्न नंदिनी, बिल्डींग, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे.

  • 01 Sep 2025 12:42 PM (IST)

    01 Sep 2025 12:42 PM (IST)

    शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

    जागेच्या कंपाऊंडमध्ये घुसुन कामगारांना व तक्रारदारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन किसन बेलदरे, मधुकर शेजवळ, रोहीत शेजवळ, सुनिता बाळु शेजवळ, हरिदास पवार, महेश शिवाजी बेलदरे, आशितोष बेलदरे (सर्व रा. वडकी ता. हवलेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमर मुरलीधर शेवाळे (४६, रा. मांजरी फार्म, शेवाळवाडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार वडकी येथील गट क्रमांक १३५० येथे हा प्रकार जून २०२४ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला.

  • 01 Sep 2025 12:22 PM (IST)

    01 Sep 2025 12:22 PM (IST)

    आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

    पुण्यासह राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी गाडेला जामीन देण्यास नकार दिला तसेच त्याच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही पुणे पोलिसांना दिले.

  • 01 Sep 2025 12:01 PM (IST)

    01 Sep 2025 12:01 PM (IST)

    आणखी एका आरोपीला केलं अटक

    बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा 28 वा अटक आरोपी आहे. अमोल गायकवाडचा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकितही अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • 01 Sep 2025 11:39 AM (IST)

    01 Sep 2025 11:39 AM (IST)

    शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी

    वाकडेवाडीतील नामांकित दुचाकीच्या शोरुममधील सुरक्षा रक्षकाला कटरचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधुन शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणारा चोरटा शोरूममधीलच कामगार निघाला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक भारत सावंत (वय २३, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates jalgaon murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • jalgaon Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
1

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक
2

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या
3

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या

पुण्यात पुन्हा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघे सिमेंट मिक्सच्या चाकाखाली आले अन्…
4

पुण्यात पुन्हा भीषण अपघात; दुचाकीवरील दोघे सिमेंट मिक्सच्या चाकाखाली आले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.