Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार; मुंबईत संतापजनक घटना

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक ११ - ०८- २०२५ रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2025 | 06:10 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

The liveblog has ended.
  • 11 Aug 2025 06:01 PM (IST)

    11 Aug 2025 06:01 PM (IST)

    राखी बांधून परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू

    भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवार (दि.९) रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान जुनी जेजुरी– कोळविहिरे मार्गावरील परिसरात हा अपघात घडला आहे.

  • 11 Aug 2025 05:51 PM (IST)

    11 Aug 2025 05:51 PM (IST)

    अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

    अमेझॉनने महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प 2027 मध्ये पूर्ण झाला आहे, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दरवर्षी १.३ अब्ज लिटरपेक्षा जास्त पाणी पुनर्भरण करता येईल. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) च्या सहकार्याने विकसित केलेला हा उपक्रम स्थानिक लघु शेतकऱ्यांना फायदा करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर या प्रदेशातील पाणीटंचाईच्या गंभीर आव्हानांना तोंड देईल.

  • 11 Aug 2025 05:50 PM (IST)

    11 Aug 2025 05:50 PM (IST)

    बीड कारागृहात गांजा वाटपावरून राडा

    एक अज्ञात व्यक्तीने बीड जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला आणि यातील गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून बंदिवानानी कर्मचाऱ्यानाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांसह कारागृह वरिष्ठांनी माहिती दिली. याच अनुषंगाने पोलीस आणि जिल्हाप्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी गांजा बंदिवानानीच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खोक्या भोसलेसह तिघा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला जामीन देखील मिळाला होता. आता खोक्याचा नवा कारनामा समोर आल्याने खोक्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • 11 Aug 2025 05:30 PM (IST)

    11 Aug 2025 05:30 PM (IST)

    वसईत देहविक्रीच्या रॅकेटमधील 12 वर्षांच्या मुलीची सुटका

    वसईतील नायगाव येथे 26 जुलै रोजी उघडकीस आलेल्या देह व्यापार रॅकेटमधून 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती. या अल्पवयीन पीडितेने एनजीओना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केवळ तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे.

  • 11 Aug 2025 05:10 PM (IST)

    11 Aug 2025 05:10 PM (IST)

    बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने संपवले जीवन

    लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट देखील आढळून आली आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रामदास श्रीरामे (रा. कमळेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड) असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

  • 11 Aug 2025 05:00 PM (IST)

    11 Aug 2025 05:00 PM (IST)

    ठाणे महापालिका दिनाचे ०१ सप्टेंबर रोजी आयोजन

     ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, ०१ सप्टेंबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच १८ ऑगस्टपूर्वी त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र-१ (ब) सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

  • 11 Aug 2025 04:55 PM (IST)

    11 Aug 2025 04:55 PM (IST)

    कर्नाटकातील भयानक प्रकार समोर

    कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रस्त्याच्या कडेला दोन मोठ्या काळ्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या पिशव्या पाहून गावकऱ्यांना संशय येऊ लागला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर पिशव्या उघडून पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. कर्नाटकमधील कोरतगेरे येथील कोलाला गावात एका महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे भाग अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्लास्टिकची पिशवी उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • 11 Aug 2025 04:35 PM (IST)

    11 Aug 2025 04:35 PM (IST)

    मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू

    आयुर्वेदीक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत लष्कर पोलिसांनी चार पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार महेश कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार सुशिला जंपले (वय ३४, रा.वारजे माळवाडी) महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एमजी रोड कॅम्प परिसरातील १८ मोतीवाला इमारतीतील सोनेरी हेल्थ आयुर्वेदीक मसाज सेंटर येथे हेल्थ स्पा आणि आयुर्वेदीक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे अशी माहिती लष्कर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. तेव्हा चार पिडीत महिलांना वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त करून, त्यांच्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी महिला पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होती. त्यानुसार लष्कर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार करीत आहेत.

  • 11 Aug 2025 04:20 PM (IST)

    11 Aug 2025 04:20 PM (IST)

    कोयते लपवण्यासाठी मुलाला आईचीच साथ

    कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले आहे. मात्र, तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्यारे अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने लपवल्याचे समोर आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या गुन्ह्यात आईलाही सहआरोपी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (२०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. मोरेसह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्या अल्पवयीनची आई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • 11 Aug 2025 04:00 PM (IST)

    11 Aug 2025 04:00 PM (IST)

    रामपाल महाराजांच्या भक्तीला विरोध, पोटच्या पोरानं केली जन्मदात्या वडिलांची हत्या

     

    धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पळसपमध्ये रामपाल महाराजांच्या भक्तीबाबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत लाकाळ असून 65 वर्षे वय होते, आरोपी मुलगा वैभव लाकाळ आहे.

  • 11 Aug 2025 03:45 PM (IST)

    11 Aug 2025 03:45 PM (IST)

    डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी

    डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह सोसायटीची ही निवडणूक होती. या निवडणुकीत जोरदार राडा झाला. संचालक पदाच्या निवडणुकीत बोगस मतदानावरुन हा सर्व गोंधळ झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्याच्या नवऱ्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • 11 Aug 2025 03:30 PM (IST)

    11 Aug 2025 03:30 PM (IST)

    स्मशानभूमीतील अघोरी पूजा गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त

     

    पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सातिवली गावात अघोरी पूजा आणि जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अघोरी पूजा आणि जादूटोण्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या आधीच अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर पूजेत सहभागी असलेल्या अशोक बात्रा याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालून अरेरावी करत घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.

  • 11 Aug 2025 03:15 PM (IST)

    11 Aug 2025 03:15 PM (IST)

    21 वर्षीय तरुणांने गळफास घेत आयुष्य संपवलं; गावकऱ्यांचा पोलिसांवरच गंभीर आरोप

     

    अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गावंडगावात येथे एका 21 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावकरी, विशेषत: महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे. गावात सहज दारू मिळते आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिविगाळ केली जाते, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

  • 11 Aug 2025 03:10 PM (IST)

    11 Aug 2025 03:10 PM (IST)

    भरधाव बसने धडक दिल्याने पती-पत्नी जखमी

    पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने कारमधील पती-पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी लांडेवाडी भोसरी येथे घडली. याप्रकरणी रामचंद्र बापू शिंदे (५२, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश सायलु कोरोमणी (६०, घोरपडी पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी त्यांच्या कारने (एमएच ४३/ए ९४९२) घरी जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस (एमएच ४३/एचओ ०४८४) भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

  • 11 Aug 2025 02:50 PM (IST)

    11 Aug 2025 02:50 PM (IST)

    खुनानंतर तीन वर्षे गुंगारा देणारे परराज्यातून अटकेत

    वानवडी परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कर्नाटकमधील विजापूर येथे सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात आले असून, ते गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातच राहत असल्याचे समोर आले आहे. सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद (३४), जाकीर कादीर सय्यद (४२) आणि अमिर अकील सय्यद (२३, रा . तिघेही सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक प्रमोद खरात व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

  • 11 Aug 2025 02:30 PM (IST)

    11 Aug 2025 02:30 PM (IST)

    सराफीपेढीत शस्त्राच्या धाकाने लुट करणारे जेरबंद

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान अन् ज्या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही तासात भरदिवसा सराफी दुकानात घुसून लुटपाट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांनी त्यांना पकडले असून, त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. चंदननगरमधील श्री आशापुरी ज्वेलर्स येथे ही घटना शुक्रवारी घडली होती.
    सनी राजू खांडेकर (वय २४), अनिल परशुराम विसरे (वय २६, रा. दोघे, इंदिरानगर गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कामगिरी उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे, वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम व त्यांच्या पथकाने केली.

  • 11 Aug 2025 02:10 PM (IST)

    11 Aug 2025 02:10 PM (IST)

    तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरी

    महावितरणच्या रोहित्राची (डीपी) तोडफोड करुन चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ५७ वर्षीय महावितरणच्या अभियंत्यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी-म्हातोबा आळंदी रस्त्यावर महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी त्याची तोडफोड करून ८० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. पोलिस कर्मचारी वणवे तपास करत आहेत.

  • 11 Aug 2025 01:50 PM (IST)

    11 Aug 2025 01:50 PM (IST)

    साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास

    सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत 'करोडपती' होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे.

  • 11 Aug 2025 01:46 PM (IST)

    11 Aug 2025 01:46 PM (IST)

    3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था

    अल्पवयीन बांगलादेशी मुलीवर 3 महिन्यांत 200 हून अधिक जणांकडून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईत मानवी तस्करीतून सुटलेली 12 वर्षीय बांगलादेशी पीडितेने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गुजरातमधील नडियाद येथे तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा खुलासा झाला आहे.200 पैकी आतापर्यंत दहा नराधमांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

  • 11 Aug 2025 01:30 PM (IST)

    11 Aug 2025 01:30 PM (IST)

    दुचाकी आदळून तरूणाचा मृत्यू

     दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकी नियत्रंण सुटल्यानंतर झाडावर जाऊन आदळली. यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार तळजाई वसाहत येथील बिकानेर चौकात ३ ऑगस्ट रोजी दोन वाजता घडला होता. उपचारा सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला. साहील उमेश जाधव (वय २३, रा. पर्वती दर्शन चाह, पर्वती) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत संतोष कमलाकर जोशी (४९) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 11 Aug 2025 01:10 PM (IST)

    11 Aug 2025 01:10 PM (IST)

    पहिली मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

    पहिली मुलगी झाल्याच्या कारणावरून त्रास देणार्‍या व आईकडून घरखर्चाला पैसे आण म्हणणार्‍या सासरच्यांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती सचिन चव्हाण याच्यासह त्याच्या आई वडीलांवर कौटुंबिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय विवाहित महिलेने तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१३ पासून ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान कोंढव्यातील सिध्दार्थनगर येथे घडला.

  • 11 Aug 2025 12:45 PM (IST)

    11 Aug 2025 12:45 PM (IST)

    विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

    पिंपरी-चिंचवड अन् पुणेकर वैष्णवी आत्महत्याप्रकरण विसरलेले नसतानाच पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह होऊन वर्ष पुर्ण होत असतानाच सासरच्यांकडून कंपनीसाठी २० लाख रुपये आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने सतत होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघे अशांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

  • 11 Aug 2025 12:25 PM (IST)

    11 Aug 2025 12:25 PM (IST)

    बारामतीत विमानाचा अपघात

    बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये विमानतळावर पायलट प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड एव्हिएशन कंपनीच्या चार्टर्ड विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. बारामती विमानतळावर शनिवारी (दि ९ ) सकाळी पावणे आठ वाजता बारामती येथील रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात झाला आहे.

  • 11 Aug 2025 12:11 PM (IST)

    11 Aug 2025 12:11 PM (IST)

    बॅरिकेडवरून उडी मारत अखिलेश यादव बाहेर

    एसआयआर विरोधात निघालेल्या खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी रोखले.   दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवरून उडी मारली.

  • 11 Aug 2025 12:05 PM (IST)

    11 Aug 2025 12:05 PM (IST)

    मंगळवेढ्याजवळ रासायनिक द्रव्याचा टँकर पलटी

    सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक केली जात होती.

  • 11 Aug 2025 11:47 AM (IST)

    11 Aug 2025 11:47 AM (IST)

    लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभंग

    पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिकअप चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी पिकअप चालक नंदु जाधव (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याबाबत २६ वर्षीय तरूणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 11 Aug 2025 11:37 AM (IST)

    11 Aug 2025 11:37 AM (IST)

    भूत काढण्याच्या बहाण्याने अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    मुंबईच्या विरार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या अंगात भूत असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा अंध आहे. तर दुसऱ्या आरोपीने त्याला लॉजवर नेण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 11 Aug 2025 11:37 AM (IST)

    11 Aug 2025 11:37 AM (IST)

    रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात

    नागपूर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात झाला.ट्रकने कट लागल्याने पत्नीपडून ट्रकच्या चाकाखाली आली. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेत घर गाठलंय. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ही घटना शहरातील नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचे सांगितलं जातंय.

  • 11 Aug 2025 11:36 AM (IST)

    11 Aug 2025 11:36 AM (IST)

    परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष

    बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बीडच्या परळी तालूक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा घटना समोर येत आहे. या प्रकरणी तीन नराधमांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 11 Aug 2025 11:27 AM (IST)

    11 Aug 2025 11:27 AM (IST)

    पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली आहे. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सराइत गुन्हेगारांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे), राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदमगल्ली) यांना अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, चेतन शिरोळकर, अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर आणि पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates mumbai crime 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Mumbai Crime case
  • Mumbai Police
  • Murder Case

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
3

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
4

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.