Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : वाशिम हादरलं! 20 वर्षीय तरुणीवर केले अनेकदा अत्याचार

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक ०३- ०८- २०२५ रोजी राज्यासह देश-विदेशातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2025 | 05:05 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला अहिल्यानगर येथे नेत दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून जऊळका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तनुज गौरकार याला अटक करण्यात आली आहे.

The liveblog has ended.
  • 03 Aug 2025 04:50 PM (IST)

    03 Aug 2025 04:50 PM (IST)

    ऑनलाइन लिंकवर क्लिक करणं पडलं महागात

    कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिक भाड्याने गाडी बुक करण्याची प्रक्रिया करत असताना सायबर चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून संशयितांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तम गायकवाड (वय ६१, रा. त्रिमूर्ती गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 03 Aug 2025 04:20 PM (IST)

    03 Aug 2025 04:20 PM (IST)

    हडपसरमधून रिक्षा चोरली अन् त्याच रिक्षाने दुकान फोडले

    पुणे शहराच्या पूर्व भागात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हडपसरमधून रिक्षा चोरली आणि त्याच रिक्षाने वाघोलीतील एका भांड्याच्या दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली. या गुन्ह्याचा छडा लावत वाघोली पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चोरीस गेलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिकेत अविनाश इंगळे (वय २१), साहिल रोशन शेख (वय २०, रा. दोघे, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बागल व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  • 03 Aug 2025 04:19 PM (IST)

    03 Aug 2025 04:19 PM (IST)

    लष्करी अधिकाऱ्याची स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण

    श्रीनगर विमानतळावर अतिरिक्त सामानावरून निर्माण झालेल्या वादात एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जुलै रोजी घडली. दिल्लीला जाणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याकडे १६ किलो वजनाचे दोन केबिन बॅग्स होत्या. मात्र, देशांतर्गत विमानप्रवासात केबिनमध्ये केवळ ७ किलोपर्यंतचे सामान विनामूल्य नेण्यास परवानगी असते. त्यापेक्षा अधिक वजनासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आणि अधिकाऱ्याने आक्रमक वर्तन करत कर्मचाऱ्यांवर हात उचलला.

  • 03 Aug 2025 04:00 PM (IST)

    03 Aug 2025 04:00 PM (IST)

    ऑनलाइन लिंकवर क्लिक करताच ३ लाखांना गंडा

    कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिकाची भाड्याने गाडी बुक करण्याची प्रक्रिया करत असताना सायबर चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून संशयितांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तम गायकवाड (वय ६१, रा. त्रिमूर्ती गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 03 Aug 2025 03:40 PM (IST)

    03 Aug 2025 03:40 PM (IST)

    तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

    सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रोड) हिंगणे खुर्द येथील खोराड वस्तीत गुरुवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्यावर राडा घालत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    याप्रकरणी रामकिसन गोरोबा टापरे (वय ४९, रा. खोराड वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2025 03:25 PM (IST)

    03 Aug 2025 03:25 PM (IST)

    ४४ सीसीटीव्हीद्वारे "ताशा"चोर पकडला

    आगामी गणेशोत्सवानिमित्ताने ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू आहेत. ठिकठिकाणी पथके रात्री सराव करतात. त्यासाठी या पथकांकडून पत्र्यांचे शेड मारून त्याचठिकाणी ढोल-ताशा ठेवले जातात. बाणेर भागात देखील पाषाण-सुस रोड येथील नवचैतन्य हास्यक्लब येथे नादलव्य वाद्य पथकाकडून सराव सुरू आहे. मात्र, सरावानंतर ढोल-ताशा ठेवून गेले असता अज्ञाताने येथून ३० ताशा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पथकाने या भागातील ४४ सीसीटीव्ही तपासले. त्यातून चोरटा वसिम हसिबूर शेख (वय २२, रा. सुसगांव) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १२ ताशा जप्त केले असून उर्वरित ताशाबाबत चौकशी सुरू केली आहे.-

  • 03 Aug 2025 03:05 PM (IST)

    03 Aug 2025 03:05 PM (IST)

    बाणेर पोलिसांची मोठी कारवाई

    पुणे शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावण्याच्या घडत असतानाच बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोबाईल चोर आणि चैन स्नॅचरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चैन व मोबाईल जप्त केला आहे. पहिल्या चैन चोरीच्या घटनेत शफिक मोदीन शेख (वय २६, रा. तलवडे) तसेच मोबाईल चोरीप्रकरणात फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. गणेशनगर, वाकड) या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 03 Aug 2025 02:55 PM (IST)

    03 Aug 2025 02:55 PM (IST)

    कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

    पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये होती. पोलीस या संभाजी नगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळळं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2025 02:30 PM (IST)

    03 Aug 2025 02:30 PM (IST)

    गोट्या गित्तेची आव्हाडांना धमकी

    जितेंद्र आव्हाड यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. फोनवर त्यांनी माझी मागितली होती. फोनवर तू''भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी...',असे म्हणत होतास, असा दावा वाल्मिक कराडचा चेला असलेल्या गोट्या गित्ते याने केला आहे. गोट्या गित्ते याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला होता. यामध्ये तो रेल्वे ट्रेनच्या रुळांवर बसलेला दिसत आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने म्हटले आहे की, 'एsss जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ. माझ्याकडे तुझी कॉल रेकॉर्डिंग आहेत. तू नेमका कोणाचा आहेस? तू वंजारी समाजाचा नाहीस. तू हे जे वागतोय ते तुला खूप महागात पडणार आहे, असा इशारा गोट्या गित्ते यांनी आव्हाडांना दिला.

  • 03 Aug 2025 02:10 PM (IST)

    03 Aug 2025 02:10 PM (IST)

    विनयभंगप्रकरणात आरोपीविरुद्ध २४ तासात आरोपपत्र

    नोकरदार तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलकरून त्याला अटक करत अवघ्या २४ तासात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या या तत्परतेने तरुणीने तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली.

  • 03 Aug 2025 02:00 PM (IST)

    03 Aug 2025 02:00 PM (IST)

    भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार

    लोहगाव येथील आश्रय सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीची चार लाख रुपयांची कार भाड्याने घेऊन परत न करता फसवणूक केल्याची घटना घडली. कार भाड्याने घेऊन परत न करता ती इतरत्र ठेवण्यात आली असून, विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी स्वप्नील महादेवराव गिन्हे (वय ३९, रा. आश्रय सोसायटी, लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शेख जावेद शेख जाफर (रा. अंबाजोगाई, बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2025 01:55 PM (IST)

    03 Aug 2025 01:55 PM (IST)

    बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

    बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराइत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. राहुल संजय नेटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक फौजदार राजू कदम, हवालदार विनोंद साळुंके, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडकर यांनी केली.

  • 03 Aug 2025 01:30 PM (IST)

    03 Aug 2025 01:30 PM (IST)

    दारु पार्टीनंतर मित्रानेच केला मित्राचा खून

    पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारु पार्टी झाल्यानंतर आई बहिणीवरुन शिव्या दिल्याच्या रागातून झोपलेल्या मित्राचा मित्रानेच डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याची घटना घडली आहे. खून करुन आरोपीने बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. पण पोलिसांनी त्याचा बनाव काही तासातच उघडकीस आणून त्याला अटक केली आहे. रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. तर किसन राजमंगल सहा (वय २०, रा. हांडेवाडी रोड, मुळ रा़ मोतीहारी, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 03 Aug 2025 01:10 PM (IST)

    03 Aug 2025 01:10 PM (IST)

    शिक्रापुरात अपंग हॉटेल कामगाराला मारहाण

    शिरुर तालुक्यातील हॉटेल शारदामध्ये काम करणाऱ्या अपंग कामगाराला चार जणांनी किचनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि एका पुरुषावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी गोविंद नारायण शिंदे (वय ३५, रा. कुंभारवाडा, शिक्रापूर) हे हॉटेलमध्ये काम करत असताना स्वाती विलास गायकवाड, अर्चना विशाल केदारी (रा. ताडीवाला रोड, पुणे), संगीता वानखेडे (रा. मोशी, पुणे) आणि महेश खांदवे (रा. लोहगाव, पुणे) हे चौघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी गोविंद यांना "तू हॉटेलमध्ये बाया पुरवतो का?" असा आक्षेपार्ह सवाल करत शिवीगाळ, दमदाटी केली आणि त्यांच्यावर किचनमध्येच हात उगारला. गोविंद शिंदे यांनी आपण अपंग असल्याचे सांगून विनवले, तरीही आरोपींनी त्यांना मारहाण करत अपमानित केले. त्यानंतर ते हॉटेलच्या अन्य खोल्यांमध्येही शोधाशोध करत फिरले. या घटनेनंतर गोविंद शिंदे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी वरील चार आरोपींविरुद्ध कलम 323, 504, 506, 452, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  • 03 Aug 2025 12:45 PM (IST)

    03 Aug 2025 12:45 PM (IST)

    नांदेड हादरलं! एका शिक्षकाने लॉजमध्ये पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

    नांदेडमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका खासगी संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकाचा एका लाऊंजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटील जवळ असणाऱ्या हॉटेल्स स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. मृत शिक्षकाचे नाव आशिष भाऊसाहेब शिंदे असे आहे. रूम सर्व्हिससाठी लॉजच्या वेटरने खूप वेळा दार वाजवलं परंतु आतून कसलाच अवाज आलेला नाही त्यामुळे रूमचा दार उघडण्यात आलं त्यावेळी आशिष शिंदे या शिक्षकाने पंख्याला गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.

  • 03 Aug 2025 12:45 PM (IST)

    03 Aug 2025 12:45 PM (IST)

    वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका

    एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल चालक संतोष सिना पुजारी (वय ३७, रा. शिक्रापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महिलांच्या तक्रारीनंतर व पोलिसांच्या बनावट ग्राहकाच्या साहाय्याने करण्यात आली.

  • 03 Aug 2025 12:30 PM (IST)

    03 Aug 2025 12:30 PM (IST)

    पुण्यात भावाने केला भावावर गोळीबार

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Aug 2025 12:10 PM (IST)

    03 Aug 2025 12:10 PM (IST)

    बड्या जुगार अड्ड्यावर छापा

    मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला असून, त्यासोबतच प्रविण बोदवडे, विजय महाडिकसह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुगार खेळणाऱ्या सहाय्यक फौजदार यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

  • 03 Aug 2025 12:00 PM (IST)

    03 Aug 2025 12:00 PM (IST)

    कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप

    पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याचा समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील रिमांड रूममध्ये पोलिसांनी तीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.

  • 03 Aug 2025 11:50 AM (IST)

    03 Aug 2025 11:50 AM (IST)

    उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक

    उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून ३० वर्षीय युवकाची धारदार शास्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच नाव साजिद शेख असं आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

  • 03 Aug 2025 11:50 AM (IST)

    03 Aug 2025 11:50 AM (IST)

    वडगाव मावळमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

    वडगाव मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना २४ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, प्राण येवले याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • 03 Aug 2025 11:48 AM (IST)

    03 Aug 2025 11:48 AM (IST)

    दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

    पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना आंबेगाव पोलिसांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन लाखांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. सुरेंद्र सुखदेव झुरंगे (वय १९, रा. खळद, ता. पुरंदर), सुयश सुनिल दुधाळ (वय १९) व प्रज्वल गंगाधर टिळेकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आंबेगाव व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले तसेच उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 03 Aug 2025 11:34 AM (IST)

    03 Aug 2025 11:34 AM (IST)

    नाशिक हादरलं! दोन अल्पवयीनांनी आपल्याच मित्राची केली हत्या

    नाशिमधील सातपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाला होता या वादातून दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. यशराज गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावीत आहे. त्याच्याच क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून त्याची हत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

  • 03 Aug 2025 11:34 AM (IST)

    03 Aug 2025 11:34 AM (IST)

    भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

    नाशिकमध्ये भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात राधाबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates washim news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case
  • Washim news

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
3

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
4

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.