Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुप्तवार्तेच्या आधारे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर राज्यातील सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 06:42 PM
FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित रॅकेटवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए), महाराष्ट्र राज्य आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली आहे. गुप्तवार्तेच्या आधारे राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.

या कारवाईत सुमारे 1.48 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 20 हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, 49 नमुने संकलित, 26 जणांविरुद्ध गुन्हा आणि 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पाच अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून चार आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Akola News: धक्कादायक! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ व्हायरल, FDAकडे तक्रार

गुप्तवार्तेवरून उलगडले भेसळीचे जाळे

एफडीएला कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त रसायनांच्या पुरवठ्याबाबत विश्वासार्ह माहिती मिळाली होती. त्यानंतर गुप्त तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान स्किम्ड मिल्क पावडर (SMP), व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल वापरून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. या रॅकेटचा मुख्य पुरवठा पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचे तपासात समोर आले.

संपूर्ण पुरवठा साखळीचा पर्दाफाश

एफडीएने केवळ भेसळयुक्त दूध जप्त करण्यापुरती कारवाई न करता संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेतला. तपासात मुख्य पुरवठादार, मध्यस्थ, दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, पॅकिंग केंद्रे आणि वितरक यांचे जाळे उघडकीस आले. सुशांत बाबनराव हिंगे हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून संदीप लोढा सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

पाच जिल्ह्यांत एकाचवेळी धाडी

४ आणि ५ जुलै २०२६ रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ३० अन्न सुरक्षा अधिकारी आणि ४० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांतील १३ आस्थापनांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, भेसळयुक्त पदार्थांचे साठे, पॅकिंग केंद्रे तसेच कृत्रिम दूध तयार करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. अनेक महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहाराच्या नोंदी, उपकरणे आणि वैज्ञानिक पुरावेही जप्त करण्यात आले.

कठोर गुन्हे दाखल

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 26 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यापैकी 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, बँक व्यवहार, पुरवठा साखळी, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही सखोल तपास सुरू आहे.

परवाने निलंबित, व्यवसाय बंद

फौजदारी कारवाईबरोबरच एफडीएने नियामक स्तरावरही कठोर पावले उचलली आहेत. पाच अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून चार आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना आवाहन

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूधासारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थात भेसळ करणे हा समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत अशा गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी दूध किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले. एफडीएने स्पष्ट केले आहे की, भविष्यातही गुप्तवार्तेच्या आधारे राज्यभर अशाच व्यापक आणि समन्वित कारवाया राबवून अन्नभेसळीच्या संपूर्ण रॅकेटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यावर भर दिला जाणार आहे.

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

Web Title: Maharashtra fake milk adulteration racket busted five districts fda police joint action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
1

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी
2

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
3

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Akola News: धक्कादायक! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ व्हायरल, FDAकडे तक्रार
4

Akola News: धक्कादायक! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ व्हायरल, FDAकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.