चॉकलेट उघडताच धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील संतोष शिंदूरसे यांनी आपल्या मुलासाठी एका नामांकित कंपनीचे चॉकलेट खरेदी केले होते. चॉकलेटचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये वळवळणाऱ्या अळ्या दिसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…
संतोष शिंदूरसे यांनी संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाची मुदत, साठवणूक आणि पॅकेजिंग यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य आरोग्याचा धोका टळल्याचेही त्यांनी सांगितले.
FDAकडे तक्रार
या घटनेनंतर संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. चॉकलेटमध्ये अळ्या कशा आल्या, उत्पादन किंवा साठवणुकीत काही त्रुटी होती का, याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑनलाइन ग्राहक मंचाकडेही धाव
याशिवाय संतोष शिंदूरसे यांनी ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने संबंधित कंपनीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तक्रारीची चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Ans: अकोल्यात एका पालकाने मुलासाठी घेतलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा दावा केला आहे.
Ans: अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Ans: चॉकलेटची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि साठवणुकीची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे






