Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांची मोठी कारवाई; महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान 94,00,00,000 रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात कोट्यवधींची मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2024 | 06:35 PM
महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान 94,00,00,000 रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त (फोटो सौजन्य-X)

महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान 94,00,00,000 रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Dhule Crime : विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी बुधवारी जिल्ह्यात पहाटेपासून प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे एक संशयास्पद कंटेनर ताब्यात घेतला. शिरपूर येथील थाळनेर गावात वाहनांच्या तपासणीत सुमारे 94 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सुमारे 10 हजार किलो चांदीचे सळे जप्त केले आहेत. या प्रकरणाची माहिती देताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले, “पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईत शिरपूर येथे एका कंटेनरमधून 94.68 कोटी रुपये किमतीचे 10 हजार किलो चांदीचा विटा जप्त करण्यात आले आहे.”

या घटनेची माहिती देताना पोलिस अधिकारी म्हणाले, “राज्यात सध्या मतदान सुरू आहे. निवडणुकीच्या काळात पोलिस प्रशासनाकडून वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आज (20 नोव्हेंबर) पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात एका कंटेनरची झडती घेतली. दरम्यान ही चांदी जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनरमध्ये सापडलेल्या मौल्यवान वस्तू कोणत्या तरी बँकेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे याआधीही मुंबई पोलिसांनी गेल्या शनिवारी एका कंटेनरमधून साडेआठ हजार किलो चांदी जप्त केली होती. त्यांची किंमत 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि जीएसटी विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राज्यातील धुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, धुळे पोलिसांचे पथक आज शिरपूर तालुक्यातील थरनेर गावात वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, कंटेनर वाहनातून 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 94 कोटी रुपये जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुप्त माहिती मिळाल्यावर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मोठ्या प्रमाणात चांदीची आवक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलीस नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी करत होते. या तपासणीनंतर त्या वाहनात चांदीच्या विटा सापडल्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, पोलिसांनी शिरपूर येथील एका मोठ्या कंटेनरमधून 94.68 कोटी रुपयांच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेली चांदी का आणली याचा तपास पोलीस पथकाने सुरू केला आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे.

Web Title: Maharashtra police seize 10000 kg of silver bricks worth over rs 94 cr in dhule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 06:35 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान
1

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
2

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
3

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय
4

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.