Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ताज पॅलेस येथे आयोजित 'महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ' कार्यक्रमात यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उपस्थिती होती. जिथे दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 13, 2026 | 05:11 PM
ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा ( सौजन्य - सोशल मीडिया )

ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा
  • परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार
  • मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra UK Partnership : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र हा सर्वात आघाडीवर आहे, या शब्दात महाराष्ट्राचे महत्व अधोरेखित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ( Maharashtra UK Partnership ) 

Government Action On Underage Drinking : 23 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दारू पाजल्यास… सरकारचा कडक इशारा, पाहा नवीन नियम

गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूके मधील सचिव, महापौर व अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून दोन्ही देशांमधील महत्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सामंजस्य कराराचे आदान प्रदान

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि यूके दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

जागतिक बाजारपेठांशी थेट जोडणी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते. पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यासारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील.

स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव

महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यासारख्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा व ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नॉर्वे देशापेक्षाही मोठी

राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स म्हणाले, यूकेच्या ज्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छितात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. या राज्याची निवड त्याच्या स्पष्ट आर्थिक ताकदीमुळे, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्वामुळे केली आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही युरोपमधील नॉर्वे देशापेक्षाही मोठी आहे. महाराष्ट्रात केवळ एका कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्हाला प्रत्यक्ष परिणाम आणि यश हवे आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यावे आणि दोन्ही देशांच्या प्रगतीला गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी यूकेमधील स्कॉटलंडचे पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार सचिव डेम अँज्युला ईगल, राज्य सचिव डग्लस अलेक्झांडर, ईयू आणि आंतरराष्ट्रीय व्यापारचे संचालक सोफी ब्राईस, दक्षिण आशियासाठी यूकेचे उप-व्यापार आयुक्त हरशबीर संघा, इंग्लंडचे दक्षिण आशियासाठी व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारतासाठी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, महापौर आदी उपस्थित होते.

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ

Web Title: Maharashtra leads in investment ecosystem cm devendra fadnavis uk partnership ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Business
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
2

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका
3

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
4

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.