Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर विशेष यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 13, 2026 | 06:29 PM
महामार्गांवर धावणार 'हवाई रुग्णवाहिका'! अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये मिळणार उपचार; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

महामार्गांवर धावणार 'हवाई रुग्णवाहिका'! अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये मिळणार उपचार; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार!
  • ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना मिळणार तातडीचे उपचार;
  • समृद्धी, मुंबई-पुणे द्रुतगती आणि मुंबई-गोवा महामार्गांवर विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन
मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

वेळापत्रक निश्चित

या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Indira Nagar SRA Project Scam: SRA यादीत मृत अन् अल्पवयीन व्यक्तींची नावे!; दुर्योधन कदम यांचे खळबळजनक आरोप

राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे हे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.

समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभागांचा समन्वय

हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे, अशा उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

अपघातातील प्रत्येक जीव अनमोल!

रस्ते अपघात रोखणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहेच; मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना वेळेत उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या मदतीने रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनामुळे महामार्गांवरील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. ‘अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि केवळ मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव अनमोल असून, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ या भूमिकेतून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Web Title: Maharashtra air ambulance service to start on expressways from new year pratap sarnaik announcement sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Air Ambulance
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत
4

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.