Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 06:31 PM
बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर!
  • पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पाच अनधिकृत आरएमसी प्लांटमधील सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. तसेच, या पाचही प्लांटचा वीजपुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने प्लांटच्या ऑपरेटिंग रूम सील केल्याने हे प्लांट बंद करण्यात आले आहेत.

बावधनमधील पाच प्लांटवर कारवाई

बावधन बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक २२१, २२३, २२४ आणि २२५ पार्ट या परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या आरएमसी प्लांटवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये द मार्क इन्फ्रा (सर्व्हे क्रमांक २२३), केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (सर्व्हे क्रमांक २२१/२, २२१/३, २२४/२, २२४/५), डीएनव्ही इन्फ्राकॉन एलएलपी (सर्व्हे क्रमांक २२५/२), यशाई इन्फ्रा आणि अल्ट्राटेक आरएमसी (दोन्ही सर्व्हे क्रमांक २२१/१) या पाच आस्थापनांचा समावेश आहे.

मोठ्या यंत्रणेद्वारे निष्कासन

महापालिकेच्या बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली. कारवाईसाठी नऊ जेसीबी, दोन गॅस कटर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान, १५ पोलीस कर्मचारी, पाच अतिक्रमण निरीक्षक आणि ४० बिगारी सेवक तैनात करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा : पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

या कारवाईदरम्यान उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांनी मार्गदर्शन केले. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांनी कारवाईचे नियोजन केले. संबंधित विभागांच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई पूर्ण केली. बावधन परिसरातील पाच आरएमसी प्लांटवर एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The municipal corporation has taken major action against five unauthorized rmc plants in bavdhan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
1

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
2

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
3

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
4

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.