Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील महाराष्ट्र राजभवनात कर्तव्यावर असताना एसआरपीएफ कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांनी सर्व्हिस रायफलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून प्रेमसंबंध, वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक परिस्थिती आणि मानसिक तणाव अशा विविध अंगांनी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 02:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र राजभवनात ड्युटीदरम्यान एसआरपीएफ जवान कौस्तुभ सांगळे यांनी सर्व्हिस रायफलने आत्महत्या केली.
  • घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून पोलिसांकडून फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपास सुरू आहे.
  • प्रेमसंबंध, वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मानसिक तणाव या सर्व बाजूंनी पोलिस चौकशी करत आहेत.
राजभवन : मुंबईतील अति-सुरक्षित मलबार हिल परिसरातील महाराष्ट्र राजभवनात कर्तव्यावर असताना एसआरपीएफच्या एका जवानाने सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जवानाचे वैयक्तिक आयुष्य, प्रेमसंबंध, कौटुंबिक परिस्थिती आणि मानसिक तणाव अशा विविध अंगांनी चौकशी सुरू असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि एसआरपीएफ अधिकारी सखोल तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल **कौस्तुभ सांगळे** यांनी मुंबईतील महाराष्ट्र लोक भवन येथे कर्तव्यावर असताना स्वतःच्या सर्व्हिस एसएलआर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. कौस्तुभ हे 2024 च्या तुकडीतील जवान होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 जून रोजी त्यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची पोस्टिंग राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या उच्च-सुरक्षा ‘महाराष्ट्र लोक भवन’ येथे करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत त्यांची ‘टॉवर-2’ येथे ड्युटी होती. कर्तव्यावर असताना ते एका बंदिस्त भागात गेले आणि तेथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. 7.62 मिमी एसएलआर रायफलची गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!

एसआरपीएफमध्ये प्रत्येक तीन तासांनी सुरक्षा पथकाची अदलाबदल केली जाते. रात्री सुमारे 9 वाजता पुढील शिफ्टचे जवान ड्युटी स्वीकारण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मलबार हिल पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि एसआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून तिची तपासणी सुरू आहे.

प्रेमसंबंधांच्या अँगलनेही तपास

सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान कौस्तुभ यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती, मात्र नंतर हे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचे लग्न दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी निश्चित झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपास यंत्रणा या घडामोडींचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचीही पडताळणी करत आहेत.

कथित खासगी फोटो आणि आत्महत्येच्या धमक्यांचाही तपास

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिला कॉन्स्टेबलचे लग्न ठरल्यानंतर कौस्तुभ यांनी तिच्यासोबतचे काही कथित खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तसेच त्यांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलला वारंवार फोन करून आत्महत्येच्या धमक्या दिल्याचाही तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महिला कॉन्स्टेबलने यापूर्वीच भाईंदर पोलिसांना परिस्थितीची माहिती दिली होती का, त्यानंतर कोणती कारवाई झाली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती का, तसेच कथित फोटो पाठवण्यामागील उद्देश काय होता, यासह अनेक मुद्द्यांची पोलीस चौकशी करत आहेत.

कौटुंबिक परिस्थितीचाही तपास

तपासादरम्यान कौस्तुभ यांच्या कौटुंबिक परिस्थितीबाबतही काही बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यांना दोन बहिणी असून त्यापैकी एका बहिणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, तर दुसरी विवाहित आहे. कौस्तुभ यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा, वैयक्तिक आयुष्याचा आणि अलीकडील घडामोडींचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

मानसिक आरोग्य तपासणीचीही पडताळणी

या प्रकरणात एसआरपीएफच्या अंतर्गत कार्यपद्धतीचीही चौकशी सुरू आहे. जवानांची नियमित मानसिक आरोग्य तपासणी झाली होती का, त्यांना समुपदेशनाची गरज भासली होती का आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मानसिक स्थितीची माहिती होती का, याचीही पडताळणी केली जात आहे. मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप आत्महत्येचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील माहिती समोर येणार असल्याचे सांगितले आहे.

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजभवनातील आत्महत्या प्रकरणात पोलिसांना काय मिळाले?

    Ans: घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली असून तिची तपासणी सुरू आहे.

  • Que: या प्रकरणात कोणत्या अंगांनी तपास केला जात आहे?

    Ans: प्रेमसंबंध, वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक परिस्थिती, मानसिक तणाव आणि सुसाईड नोट या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.

  • Que: कौस्तुभ सांगळे कोण होते?

    Ans: कौस्तुभ सांगळे हे कोल्हापूर येथील एसआरपीएफ गट-16 मधील कॉन्स्टेबल असून त्यांची नुकतीच मुंबईतील महाराष्ट्र राजभवनात नियुक्ती झाली होती.

Web Title: Maharashtra raj bhavan srpf jawan commits suicide at raj bhavan investigation underway into suicide note romantic relationship and mental stress shocking details emerge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
1

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
2

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.