काय नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी विकी घनघाव आणि दीपक कसबे यांनी त्यांचा मित्र प्रकाश कैलास येडके (वय 28) याला नक्षत्रवाडी परिसरात नेले. तिथे त्याला दारू पाजल्यानंतर किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि दोन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने प्रकाशवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्बल काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 3 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम वाढवून पोलिसांनी तपासाची गती वाढवली. आरोपी फरार झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली.
रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
फरार होताना दीपक कसबे याने हर्सूल परिसरातील एका मित्राचा मोबाईल सोबत घेतला होता. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर त्याने तो मोबाईल सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढले. उज्जैनहून खासगी टॅक्सीने परत येत असताना महामार्गावरच सापळा रचून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. दरम्यान, दुसरा आरोपी विकी घनघाव हा सोमवारी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.
मित्रावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर 23 जून रोजी दोन्ही आरोपी वाराणसीला पळून गेले होते. तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर ते गुपचूप पुन्हा छत्रपती संभाजीनगरात परतले. मात्र, प्रकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच दोघे वेगवेगळ्या दिशेने निघाले. दीपक कसबे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेला. पोलिसांनी त्याचा माग काढून अखेर त्याला उज्जैन महामार्गावर अटक केली.
मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड; शॅम्पू, डिटर्जंट पावडरसह मोठा साठा जप्त
Ans: मध्य प्रदेशातील उज्जैन महामार्गावरून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
Ans: दारू पाजल्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ans: पोलिसांनी सर्व मार्गांवर नाकाबंदी केल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला.






