Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!

छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राला दारू पाजून धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन महामार्गावरून अटक केली. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दुसरा आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 01:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मित्राला दारू पाजून धारदार शस्त्राने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल.
  • फरार आरोपीचा मध्य प्रदेशापर्यंत पाठलाग करून उज्जैन महामार्गावर पोलिसांनी अटक केली.
  • मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासामुळे आरोपी सापडला, तर दुसरा आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राला दारू पाजून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर तो फरार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अखेर उज्जैन महामार्गावर अटक केली आहे. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि अचूक नियोजनाच्या जोरावर पोलिसांनी ही कारवाई केली. तर दुसरा आरोपी सर्व मार्ग बंद झाल्याचे लक्षात येताच स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी विकी घनघाव आणि दीपक कसबे यांनी त्यांचा मित्र प्रकाश कैलास येडके (वय 28) याला नक्षत्रवाडी परिसरात नेले. तिथे त्याला दारू पाजल्यानंतर किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि दोन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने प्रकाशवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्बल काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 3 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम वाढवून पोलिसांनी तपासाची गती वाढवली. आरोपी फरार झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली.

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

फरार होताना दीपक कसबे याने हर्सूल परिसरातील एका मित्राचा मोबाईल सोबत घेतला होता. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर त्याने तो मोबाईल सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढले. उज्जैनहून खासगी टॅक्सीने परत येत असताना महामार्गावरच सापळा रचून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. दरम्यान, दुसरा आरोपी विकी घनघाव हा सोमवारी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.

मित्रावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर 23 जून रोजी दोन्ही आरोपी वाराणसीला पळून गेले होते. तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर ते गुपचूप पुन्हा छत्रपती संभाजीनगरात परतले. मात्र, प्रकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच दोघे वेगवेगळ्या दिशेने निघाले. दीपक कसबे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेला. पोलिसांनी त्याचा माग काढून अखेर त्याला उज्जैन महामार्गावर अटक केली.

मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड; शॅम्पू, डिटर्जंट पावडरसह मोठा साठा जप्त
‎

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला पोलिसांनी कुठून अटक केली?

    Ans: मध्य प्रदेशातील उज्जैन महामार्गावरून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.

  • Que: या प्रकरणात प्रकाश येडके यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: दारू पाजल्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: दुसऱ्या आरोपीने काय केले?

    Ans: पोलिसांनी सर्व मार्गांवर नाकाबंदी केल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime murdered a friend after plying him with alcohol and fled to madhya pradesh but got caught due to this one mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
2

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.