सौजन्य - सोशल मिडीया
पंढरपुरात वैद्यकीय तपासणीनंतर येरवड्याकडे रवानगी
काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार असताना शरद कोळी याला सांगली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेश क्रमांक २०२६/डी.सी.बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६ (दिनांक १७/०९/२०२६) अन्वये ही स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शरद कोळीची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे झाली कारवाई
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद कोळी याच्यावर सोलापूर आणि आसपासच्या परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवलेले आहेत. वाळू चोरी आणि तस्करी व्यापाऱ्यांकडे आणि नागरिकांकडे खंडणी मागणे. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. या सर्व विघातक कृत्यांची गंभीर दखल घेत ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजारे, बेकायदेशीर सावकार बेकायदेशीर लॉटरी चालवणारे आणि मानवी अपहरण करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (सुधारणा १९९६, २००९, २०१५ व २०२५) च्या कलम ३(१) प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहाय्य पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जिल्लावार यांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर अशा प्रकारे थेट १ वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.






