Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Sciences University Scam: बनावट पावत्यांचा खेळ; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार

Maharashtra University fraud: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या बनावट पावत्या तयार करून ₹१.५३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 07, 2025 | 04:49 PM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार (Photo Credit - X)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • आरोग्य विज्ञान विद्यापीठात १.५३ कोटींचा घोटाळा!
  • बनावट पावत्या तयार करून रक्कम खात्यावर वर्ग
  • बडतर्फ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी व साक्षांकित प्रक्रियेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या रकमेच्या बनावट पावत्या तयार करून सुमारे दीड कोटीची रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बडतर्फ कक्ष अधिकाऱ्यासह तिघांविरूद्ध म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ च्या पूर्वी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिक्षा विभागात घडला आहे.

असा झाला घोटाळा

विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सिताराम कडू यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर परदेशात शिक्षणासाठी जावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या ट्रान्स्क्रीप्ट कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच विद्यापिठाने दिलेल्या प्रमाणपत्रांतील नावातील दुरूस्ती, कागदपत्रांचे साक्षांकन आदी कामांसाठी विद्यापीठाकडून शुल्क आकारणी केली जाते. सदरचे काम हे कक्ष अधिकारी विजय मधुकर जोंधळे, वरिष्ठ लिपीक सुरद्र मारूती रोकडे व शिपाई अर्चना प्रकाश निकम यांच्यामार्फत केले गेले.

हे देखील वाचा: MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले शुल्काची रितसर विद्यापीठामध्ये भरणा करण्याऐवजी या तिघांनी संगनमत करून या शुल्काच्या बनावट पावत्या तयार केल्या व सुमारे एक कोटी, ५३ लाख, १० हजाराची रक्कम परस्पर आपल्या बैंक खात्यात वर्ग करून रकमेचा अपहार केल्याची बाब विद्यापीठाच्या अंतर्गत तपासणीत उघडकीस आली.

बडतर्फी आणि निलंबन

याप्रकरणी विद्यापीठाने चौकशी सरू केली असता, त्यात उपरोक्त तिन्ही कर्मचारी दोषी आढळून आल्यावर जोंधळे, रोकडे व निकम या तिघांनाही प्रारंभी निलंबित करण्यात आले होते. त्यांची अधिक चौकशी केल्यावर विजय जोंधळे यांचा या प्रकरणातील सहभाग अधिक उघड झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला तर सुरेंद्र रोकडे व अर्चना निकम यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले.

व्यापती वाढल्याने तक्रार

दरम्यान, अपहाराची रक्कम विद्यापीठाला भरून देण्यासाठी संबंधितांना मुदत देण्यात आली. या मुदतीत विजय जीवळे यांनी सुमारे ७० लाखाचा भरणा केला. परतु गुन्ह्याची व्याती लक्षात आल्यावर ही रक्कम दीड कोटीच्या घरात गेल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा म्हसरूळ पोलिसात डॉ. संदीप कडू यांनी फिर्याद दिली. यधकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बळवंत गावीत करीत आहेत.

हे देखील वाचा: Nashik Crime: कुख्यात लोंढे टोळीचा भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलिसांचा सुगावा लागताच ३४ फुटांवर मारली उडी

Web Title: Major financial embezzlement at maharashtra university of health sciences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Nashik
  • Nashik Crime
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास
1

Nashik Crime: नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक
2

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार
3

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार

‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
4

‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.