पुण्यात झालेल्या हत्येचे आरोपी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात, आरोपींचा बिहारला पळून जाण्याचा डाव लावला उधळून
पुण्यातील हिंजवडी परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढत बिहारला जाण्याचा निर्णय घेतला होता. आरोपी बिहारला जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. पुणे पोलिसांनी त्वरीत डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना संपर्क साधला आणि झालेल्या सर्व घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर अवघ्या २० मिनीटातच मानपाडा पोलिसांना दोन्ही आरोपींना कल्याण स्टेशन बाहेरच्या परिसरातून ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा- धक्कादायक! हॉटस्पॉट देण्यास नकार, रागात केली मॅनेजरची हत्या; एकाला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करणारे आरोपी बिहारला जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांनी त्वरीत डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या २० मिनीटातच मानपाडा पोलिसांना दोन्ही आरोपींना कल्याण स्टेशन बाहेरच्या परिसरातून ताब्यात घेतले. राजू कुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी या आरोपींची नावे आहे. या दोघांनी प्रवीण महतो या व्यक्तीची हत्या केली आहे. प्रवीण याचे राजू कुमार याच्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरुन प्रवीणला संपविण्यात आले.
पिंपरी चिंचवाडी येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात एक हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. एका नर्सरीमध्ये काम करणाऱ्या प्रवीण महतो याची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पुणे येथील वाडक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपासात समोर आले की, प्रवीम महतो याची हत्या करणारे दोन आरोपी कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते बुधवारी रेल्वेने बिहारला जाणार आहे. सुनिल कुराडे यांनी दोन वर्षे डोंबिवली एसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांना हे माहिती होते की, या आरोपींचा छडा कोण लावू शकतात. त्यांनी याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांना दिली.
हेदेखील वाचा- मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी
कादबाने यांनी पोलीस निरिक्षक राम चोपडे यांचा मार्गदर्शनाखाली प्रशांत आंधळे यांचे एक तपास पथक नेमले. हे तपास पथक बुधवारी पहाटे सहा वाजताच कल्याण स्टेशनला पोहचले. पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. सहा वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आणि स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी असते. शाेध घेत असताना फोटोत दिसणारे दोन संशयीत एका मेडिकल स्टोरवर दिसून आले. पोलिसांनी त्या दोघांना लगेचच ताब्यात घेतले. प्रवीण महतोची हत्या करणारे हे दोघे होेते. सध्या या दोन्ही आरोपीना मानपाडा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील तपास पुणे पोलीस करणार आहे.
मानपाडा पोलिसांनी अवघ्या २० मिनिटात या दोघांना अटक केली आहे. या बाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल कुराडे यांनी सांगितले, प्रवीण महतो याचा बिहार येथे राहणारा शिक्षक राजू कुमार याच्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरुन राजू कुमार हा धीरजकुमार याला भेटला. धीरज हा काही महिन्यापूर्वी प्रवीणचा नर्सरीत काम करीत होता. धीरज याने राजूकुमार याला बिहारहून बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून प्रवीणचा काटा काढला.