मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी (फोटो सौजन्य - pinterest)
मुंबईत एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकाशी झालेल्या वादानंतर बेस्ट बसचे स्टेअरिंग चालकाकडून हिसकावून घेतले. यानंतर त्याने रस्त्यावर बस चालवण्यास सुरुवात केली. मात्र या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील 3 जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने रस्त्यावरील कार आणि दुचाकींना देखील धडक दिली. त्यामुळे या घटनेत कार आणि दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या लालबाग परिसरात ही घटना घडली आहे.
हेदेखील वाचा- मोबोक्रसी निर्माण झाली आहे; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा राजकीय नेत्यांना फटकारलं
याप्रकरणी बस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या लालबाग परिसरात एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाने बसचं स्टीयरिंग चालकाकडून हिसकावून घेतलं. त्यांनंतर त्याने बस चालण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरील कार, बाईक आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत 9 जण जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रवाशाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकाशी झालेल्या वादानंतर बेस्ट बसचे स्टेअरिंग हिसकावून घेतले. स्टेअरिंग दाबून ठेवल्याने बेस्ट बसचा तोल गेला आणि पायी जाणाऱ्या अनेक प्रवाशांना बसची धडक बसली. बेस्ट बसच्या धडकेने नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रवाशाच्या कृतीमुळे बसचे नियंत्रण सुटले आणि शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींना धडक दिली आणि अपघात झाला. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा- रेल्वेत वृद्धासोबत झालेल्या गैरवर्तनाचे सत्य समोर; 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही मुंबई महानगरपालिका BMC ची वाहतूक शाखा आहे. रूट 66 (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर) येथून एक इलेक्ट्रिक वाहन सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली. मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घातली. लालबाग येथील गणेश टॉकीजजवळ बस आल्यानंतर अचानक त्याने स्टेरिंग पकडले, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
चेंबूर येथील गव्हाणपाडा परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारने पाण्याच्या टँकरला धडक दिली. या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही एकाच भागातील रहिवासी होते.