Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 11:16 AM
अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; 'ते' 76 जण पोलिसांच्या रडावर

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; 'ते' 76 जण पोलिसांच्या रडावर

Follow Us
Follow Us:

पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली असून, ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे. आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

 

सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील, चेतन धनवडे, पोलिस अंमलदार चेतन बराटे, शेलार, पाडळे, अनिरूद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

उत्तमनगर पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी प्रेमप्रकरणातून गेल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा फरार होता. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्याकडून हद्दीतील सराईतांची ‘परेड’ घेण्यात आली होती. तेव्हा त्यांनी हद्दीत काही बेकायदेशीर असेल तर कळविण्याचे सूचवले होते. तेव्हा पोलिस निरीक्षक क्षिरसागर यांना माहिती मिळाली त्यानूसार पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, चौघांचा शोध सुरू आहे.

३०० ट्रान्झेक्शन अन् ड्रग्ज रॅकेट उघड

राठ्या राठोड याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्यात जवळपास ३०० हून अधिक ट्रान्झेक्शन झाल्याचे दिसून आले. हा व्यवहार जवळपास ९ लाखांचा होता. त्यात दोन ते अडीच हजारांचे ट्रान्झेक्शन जास्त प्रमाणात होते. तर, काही ट्रान्झेक्शन हे १० ते १५ हजारांचे होते. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी या सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या असता ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले.

हे सुद्धा वाचा : शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

‘ते’ ७६ जण पोलिसांच्या रडावर

राठ्या राठोड याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केल्यानंतर ३०० ट्रान्झेक्शनमधील चाळणी केली. त्यात ७२ जणांना त्याने हे एमडी विकले असल्याचे दिसून आले. तर चौघांकडून ड्रग्ज विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यानूसार, आता पोलिस हे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवणार असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे पेणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

Web Title: Many people have come under the police radar after pune police busted a major drug racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • crime news
  • Drugs Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.