Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्…

पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 08:36 AM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : सिन्नर तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी बलात्काराचे गंभीर कलम वाढवत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरोपी शरद आथरे (रा. उंबरखेड, ता. निफाड) हा पीडितेच्या घरी आला होता. त्याने चहामध्ये गुंगीचे औषध देऊन पीडितेवर पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता.

२४ मार्च रोजी न्यायालयात नोंदवलेल्या जबाबातही तिने संपूर्ण सत्य मांडले नव्हते. मात्र, ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून तिने दिलेल्या पुरवणी जबाबात संपूर्ण आपबीती सांगितली. आरोपीने तिच्या मासिक पाळीच्या काळातही जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचेही या वेळी उघड झाले.

आधी विनयभंगाचा गुन्हा नंतर अत्याचार

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली. सुरुवातीला दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पीडितेच्या पुरवणी जबाबानंतर बलात्कारासह इतर गंभीर कलमे वाढवण्यात आली असून, पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.

अल्पवयीन मुलावर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.

शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

Web Title: Married woman abused after being drugged forced abused acts committed even during menstruation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Abused Case
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • crime news

संबंधित बातम्या

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
1

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
2

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
3

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
4

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.