JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या
विरोध असताना नेमणूक
पंजाबवरून एक समिती आली होती. त्या समितीने रणवीर सिंग यांची नेमणूक केली होती. त्या नेमणुकीला स्थानिक शीख बांधवांचा विरोध होता. आमचा विरोध असताना नेमणूक का? असा पवित्रा हा स्थानिक शीख बांधवानी घेतला आणि त्यावरून वाद सुरू झाला. नेमणुक होण्या आधीच वाद सुरू झाला होता. ४ तारखेल त्याच रूपांतर हे थेट भांडणात झालं. आणि गुरुद्वारा परिसरातच वादाला सुरुवात झाली. त्यातून दगडफेक आणि गोळीबाराची घटना घडली आहे. आता या प्रकरणात तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून याचा तपास सध्या सुरू झाला आहे.
पोलीस तपास सुरु
दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ दाखल झाले. वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस याचा तपास करत असून दोन गटाच्या प्रतिनिधीची चौकशी केली जाईल. नक्की वाद का ओढवला आणि करण काय याचा तपास पोलीस करत आहेत. पंजाबची समिती आणि स्थानिक शीख बांधव यांच्यातील विसंवाद याला कारणीभूत ठरला आणि त्याच परिणाम म्हणून दगडफेक पाहायला मिळाली. आता पोलीस बंदोबस्त २४ तास हा गुरुद्वारा परिसरात तैनात असणार आहे.
Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
Ans: गुरुद्वारा उत्तराधिकाऱ्याच्या नेमणुकीवरून दोन शीख गटांत वाद होऊन दगडफेक व गोळीबार झाला.
Ans: पंजाबहून आलेल्या समितीने केलेल्या नेमणुकीला स्थानिक शीख बांधवांचा विरोध होता.
Ans: परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






