
विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू
पहाटे बिछान्यावर न दिसल्याने शोधाशोध
देवरूख पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद
देवरूख: देवरूख तालुक्यातील वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे मृत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवरूख पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा मोहिते या नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून घरात झोपल्या होत्या. दरम्यान, पहाटे सच्चाचार वाजण्याच्या सुमारास त्यांचा ७ वर्षांचा मुलगा आलोक वाला जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही.
मुलाने घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठवले, ताराबाई व आलोक यानी घरात शोधाशोध केली. मात्र अक्षरा मिळून आल्या नाहीत, घाबरलेल्या मुलाने व ताराबाईनी शेजारी राहणारे काका दताराम तुकाराम मोहिते यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असत घराबाहेरील बाथरूममध्ये भाजलेल्या अवस्थे आढळून आल्या.
नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तत्काळ देवरूख पॉलिसांना दिली, पोलिसानी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले, याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वयें आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
रक्ताचं नातंच ठरलं खुनी
कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या हत्येचं उलगडा केला आहे. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत स्वतःच्या वागण्याने त्रासलेल्या मेहुण्याने आणि सख्ख्या भावाने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विठ्ठल कुराडी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल कुराडी धारवाडच्या रामनकोप्पा गावातील रहिवासी आहे. एका मंडप डेकोरेशनच्या दुकानात तो काम करत होता. त्याला दारूचे चांगलेच व्यसन जडले. या व्यसनामुळे तो घरी गेल्यावर पत्नी कस्तुरीशी दररोज भांडण करायचा, तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून कस्तुरी आपल्या तीन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. पण विठ्ठलचा त्रास तिथेच थांबला नव्हता.