नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल कुराडी धारवाडच्या रामनकोप्पा गावातील रहिवासी आहे. एका मंडप डेकोरेशनच्या दुकानात तो काम करत होता. त्याला दारूचे चांगलेच व्यसन जडले. या व्यसनामुळे तो घरी गेल्यावर पत्नी कस्तुरीशी दररोज भांडण करायचा, तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून कस्तुरी आपल्या तीन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. पण विठ्ठलचा त्रास तिथेच थांबला नव्हता.
विठ्ठलच्या मृत्यूमागे दोन वेगळी कारणे
विठ्ठलाच्या मृत्यूमागे दोन वेगळी कारणे होती. पहिला त्याचा मेहुणा पुंडलीक आपल्या बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे पेटून उठला होता. तर दुसरीकडे, विठ्ठलच सक्खा भाऊ अन्नाप्पा देखील त्याला मारण्याचा कट रचत होता. कारण काही दिवसांपूर्वी विठ्ठलने अन्नाप्पाची सायकल चोरली होती आणि रागाच्या भरात ती जाळून खाक केली होती. अश्या दोन वेगवेगळ्या कारणामुळे विठ्ठलचे दोन जवळचे नातेवाईक त्याचे कट्टर शत्रू बनले होते.
कसला रचला मृत्यूचा सापळा
२३ डिसेंबर रोजी विठ्ठल आपल्या मामाच्या गावी गेला होता. तिथे तो एका मंदिरासमोर झोपला होता. याच संधीचा फायदा घेत पुंडलिक आणि अन्नाप्पा तिथे पोहोचले. त्यांनी आधी विठ्ठलला विश्वासात घेऊन भरपूर दारू पाजली. विठ्ठल नशेत धुंद होताच, दोघांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीला अटक
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनेचा पंचनामा करून तपास सुरु केला. विठ्ठलाचे कुणाशी वाद होते, याची माहिती काढली असता भाऊ आणि मेहुण्यावर संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. सायकल जाळल्याची बदला आणि बहिणीचा छळ थांबवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
Ans: दारू पाजून नशेत असताना धारदार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केली.
Ans: पत्नीचा छळ थांबवणे आणि सायकल जाळल्याचा राग.
Ans: भाऊ आणि मेहुण्याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.






