Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक

आरोपींनी आपसात संगनमत करून डॉ. मयूर काठोळे याने किरण संचेती यांना काठोळे हॉस्पिटल येथे मेडिकल सुरु करण्यासाठी ८० लाख ११ हजार ३१९ रुपये घेतले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2025 | 02:35 AM
Crime News: धक्कादायक! औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: हॉस्पिटल मध्ये मेडिकल सुरु करण्यासाठी तसेच मेडिकल सुरु केल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल मधून घेतलेल्या औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची तब्बल ९५ लाख ११ हजार ३१९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२३ ते ३ मे २०२५ या कालावधीत घडला.

किरण किशोर संचेती (३४, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. मयूर संजय काठोळे, संजय शंकर काठोळे, दिगंबर चंद्रकांत गवळी, बळीराम आनंदराव घोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून डॉ. मयूर काठोळे याने किरण संचेती यांना काठोळे हॉस्पिटल येथे मेडिकल सुरु करण्यासाठी ८० लाख ११ हजार ३१९ रुपये घेतले. त्या पैशांचा डॉ. काठोळे याने वैयक्तिक लाभासाठी वापर केला. त्यानंतर डॉ. काठोळे याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी संचेती यांच्या मेडिकल मधून १५ लाख रुपयांची औषधे नेली. त्याचे पैसे संचेती यांना दिले नाहीत. आरोपींनी संचेती यांची एकूण ९५ लाख ११ हजार ३१९ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक

भागीदारी मध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीकडून ४८ लाख २१ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना १८ जानेवारी २०२१ ते १ एप्रिल २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली. ऋषिकेश शिवाजी हिवरकर (३१, वराळे, मावळ) यांनी  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वासुदेव उर्फ लक्ष्मण कल्याण पिसाळ, दैवशाला वासुदेव पिसाळ (दोघे रा. डुडुळगाव, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Crime: भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ऋषिकेश यांना भागीदारीत पाईन वूड खरेदी-विक्री व उत्पादन हा व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले. ऋषिकेश यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी गोल्डन टिंबर्स या नावाने फर्म रजिस्टर केली. यामध्ये ऋषिकेश यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यानंतर फर्मचे बँक खाते सुरु केले. ऋषिकेश यांच्याकडून व्यवसायासाठी एकूण ४८ लाख २१ हजार ५०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली.

आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक

क्विक एक्स इंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ४३ लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यक्तीला परताव्याच्या नावाखाली १५ लाख रुपये दिले. त्यानंतर परतावा अथवा गुंतवलेली रक्कम न देता २८ लाखांची फसवणूक केली. ही घटना जून २०२१ ते २ जून २०२२ या कालावधीत कासारवाडी येथे घडली.

Web Title: Medical professional cheated of rs 95 lakhs without paying for medicines pimpri crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • PCMC News

संबंधित बातम्या

Pune News : ‘गरजा बाजूला ठेवून दिखावा…’, ३० कोटींत बांधलेला पूल १९ कोटींच्या सौंदर्यीकरणासाठी बंद केल्याने नागरिकांचा प्रश्न 
1

Pune News : ‘गरजा बाजूला ठेवून दिखावा…’, ३० कोटींत बांधलेला पूल १९ कोटींच्या सौंदर्यीकरणासाठी बंद केल्याने नागरिकांचा प्रश्न 

Accident News : केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी; मोर नदी पुलावरील अपघातात 25 जण जखमी
2

Accident News : केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी; मोर नदी पुलावरील अपघातात 25 जण जखमी

Pune Murder: पुण्यनगरीत दिवसाढवळ्या बाजीराव रोड रक्तरंजित; तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले
3

Pune Murder: पुण्यनगरीत दिवसाढवळ्या बाजीराव रोड रक्तरंजित; तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
4

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.