
Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक
एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे सुरू असलेल्या चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) महिला एकेरी गटात मुंबईच्या सोनाली कुमारी आणि रत्नागिरीच्या आकांक्षा कदम यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोनालीने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला, तर आकांक्षाने मुंबईच्या मिताली पाठकला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेला महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेची मान्यता आहे.
महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत सोनाली कुमारीने केशर निर्गुणचा 25-6, 25-1 असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या लढतीत आकांक्षा कदमने मिताली पाठकला 21-16, 24-9 असे नमवले.
Kabaddi Tournament : बीपीटीचा टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय; उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेशी लढत
पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत मुंबईच्या प्रफुल्ल मोरेने मुंबई उपनगरच्या साबीर अख्तर शेखचा 25-7, 25-0 असा पराभव केला. सिद्धांत वाडवलकरने महम्मद घुफ्रानवर 25-10, 13-25, 23-19 अशी मात केली. प्रशांत मोरेने सौरभ मतेला 19-16, 22-18 असे हरवले. पुण्याच्या अभिजित त्रिपणकर आणि सागर वाघमारे यांच्यातील लढतीचा निकाल 19-23, 19-9, 2-20 असा लागला.
महिला एकेरीच्या अन्य सामन्यांत मुंबईच्या ऐशा साजिद खानने ठाण्याच्या मधुरा देवळेला 25-10, 17-23, 19-18 असे पराभूत केले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरवर 25-9, 4-25, 25-8 अशी मात केली.