Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

Leopard: जखमी मीना सुवरे यांना स्थानिकानी तातडीने फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, जिये डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 15, 2026 | 03:26 PM
कोंडये सुवरेवाडीत भीतीचे सावट

कोंडये सुवरेवाडीत भीतीचे सावट

Follow Us
Follow Us:
  • संगमेश्वरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ
  • दरवाजा उघडताच झेप; महिला थोडक्यात वाचली
  • कोंडये सुवरेवाडीत भीतीचे सावट
संगमेश्वर/Leopard: संगमेश्वर (Ratnagiri) तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुवरे यांच्या घराशेजारी असलेल्या चिरेबंदी खोलीत नेहमीप्रमाणे संध्याकाळी कोंबड्या शिरल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. मात्र, दरवाजा लावण्यापूर्वीच एक बिबट्या छुप्या मार्गाने या खोलीत शिरल्याचा कोणालाही संशय आला नाही. त्यामुळे बिबट्या रात्रभर त्या खोलीतच बंदिस्त राहिला आणि त्याने आत असलेल्या सर्व कोंबड्यांचा फडशा पाडला. रात्रभर चाललेल्या या प्रकाराची किंचितही कुणकुण घरातील सदस्यांना लागली नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी मीना धोंडू सुवरे या नेहमीच्या सवयीप्रमाणे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडण्यास गेल्या. दरवाजा उघडताच आत कोंबड्याऐवजी बाहेर पडण्यासाठी व्याकुळ झालेला बिबट्या दबा धरून बसलेला दिसल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दरवाजा उघडताच बिबट्याने सुटकेसाठी थेट बाहेरच्या दिशेने भीषण झेप घेतली आणि जंगलाकडे पळ काढला.

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

या धावपळीत बिबट्याचे नख मीना याच्या चेहऱ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या, सुदैवाने बिबट्याने पुन्हा हल्ला न केल्याने मीना सुवरे यांचा जीव थोडक्यात वाचला. घटनेनंतर जखमी मीना सुवरे यांना स्थानिकानी तातडीने फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, जिये डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले.

या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ हादरून गेले असून संपूर्ण सुधरेवाडीत भीतीचे सावट पसरले आहे. गौढे व आडोशाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बिबट्याची दहशत सुरूच

कोकणातील काही जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार बिबटे नागरी वस्तीत दिसू लागल्याने नागरिक भितीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (10 ऑक्टोबर) पहाटे परिसरातील स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोर बिबट्या फिरताना दिसला. हा संपूर्ण प्रकार घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Web Title: Sangmeshwar kondye suvrewadi leaopard attack on women ratnagiri tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
1

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत
2

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत

क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत
3

क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
4

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.