Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन महिने तिचा लैंगिक व मानसिक छळ करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 10:05 AM
मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

Follow Us
Follow Us:
  • २५ वर्षीय शेजाऱ्याने १४ वर्षीय मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
  • आरोपीने हे व्हिडीओ मित्रांना दिले; त्यांनीही मुलीवर अत्याचार केले, तर अन्य ३ तरुणांनी फोन करून धमक्या दिल्या.
  • पीडितेने कुटुंबाला सांगताच पोलिसांनी ६ जणांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून २ आरोपींना अटक केली आहे.
मिरा-भाईंदर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा, तर अन्य तीन जणांनी तिला मानसिक त्रास देत धमकावल्याचा गंभीर प्रकार काशिमिरा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी सहा जणांविरोधात पोक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काशिमिरा परिसरातील एका इमारतीत कुटुंबीयांसह राहते. कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर ती काही वेळ घरात एकटी असायची. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याच इमारतीत राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने जून महिन्यात तिचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याचा आरोप आहे.

यानंतर संबंधित तरुणाने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला मानसिक दबावाखाली ठेवले. या धमकीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेवर अत्याचार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्याने हे व्हिडीओ आपल्या दोन मित्रांना दिल्याचा आरोप आहे. व्हिडीओ हातात आल्यानंतर या दोघांनीही पीडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. संबंधित व्हिडीओ सार्वजनिक करण्याची भीती दाखवत पीडितेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, अन्य तीन तरुणांकडूनही पीडितेला फोन करून भेटण्यासाठी बोलावले जात होते. त्यांच्या म्हणण्यानुसार वागले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याने पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळल्यानंतर अखेर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ काशिमिरा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी सहा आरोपींविरोधात पोक्सोसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या भूमिकेबाबतही तपास केला जात आहे.

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?

दरम्यान, पोलिसांकडून पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. तसेच तिच्याशी संबंधित कोणतेही फोटो, व्हिडीओ किंवा ओळख पटवणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारे व्हिडीओ किंवा डिजिटल माध्यमांचा वापर करून अल्पवयीन मुलींना धमकावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Mira bhayandar minor girl sexual assault objectionable video threat six accused booked two arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime news
  • Mira Bhayander
  • Rape Case

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.