Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….; मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला शिंदे गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात सुरू असलेल्या महापालिकेच्या जलवाहिनीसंबंधित काम सुरु होतं. या कामाचा व्हिडिओ करत असताना मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 11:12 AM
Mira Bhayander : पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….; मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला शिंदे गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:
  • पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….;
  • मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
मिरा रोड/ विजय काते : मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात सुरू असलेल्या महापालिकेच्या जलवाहिनीसंबंधित काम सुरु होतं. या कामाचा व्हिडिओ करत असताना मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी मुख्य आरोपी नवीन सिंग ठाकूर याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार हे शिवसेना शिंदेगटाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदेव पार्क परिसरात महापालिकेकडून जलवाहिनी अंथरण्याचे काम मागील काही दिवसांपासून हे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे पालिकेच्या या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मनसे पदाधिकारी रेश्मा तपासे या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्या पालिकेच्या कामकाजाचा व्हिडिओ बनवत असताना त्यांच्या मागे एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत धूम्रपान करत उभी राहिली.यावेळी मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे यांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला असता त्याने आक्रमक होत “तुझं कच्चं मटण मला खायचं आहे” अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने दगडाने स्वप्नील तपासे यांच्या डोक्यावर हल्ला केला.

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

ही घटना पाहून आरोपीचे इतर साथीदारही घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी लोखंडी रॉड व इतर साहित्याच्या सहाय्याने स्वप्नील तपासे यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र आरोपींचा संताप इतका वाढला होता की त्यांनी पोलिसांसमोरच चॉपर काढून मनसे पदाधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

ही संपूर्ण घटना उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या प्रकरणी स्वप्नील तपासे यांच्या तक्रारीवरून मिरा रोड पोलीस ठाण्यात नवीन सिंग ठाकूर, कृष्णा, गोलू सिंग, रावण ठाकूर आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे मिरा रोड परिसरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मनसे कार्यकर्त्यांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Beed Accident: बीड जिल्ह्यात हळहळ! लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केज तहसीलदारचे यांचा जागीच मृत्यू

Web Title: Mira bhayander chopper pulled out in front of police fatal attack on mns office bearer case registered against five people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
2

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
3

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
4

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.