खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार (File Photo : Crime)
बारामती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता बारामती शहरातील अनंतआशा नगर परिसरात राहणाऱ्या एका 52 वर्षीय नराधमाने ओळखीचा गैरफायदा घेत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन शमशुद्दीन झारे उर्फ राजू (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित बालिकेच्या शेजारीच राहत असून, पीडितेच्या कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
पीडित मुलीने हिंमत दाखवून आपल्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी तत्काळ बारामती शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी हसन हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची शिक्षा भोगली आहे. या आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेने बारामती शहर परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विवाहितेवर गुंगीचे औषध
सिन्नर तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी बलात्काराचे गंभीर कलम वाढवत आरोपीला अटक केली आहे.
धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्…






