Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marriage Fraud: लग्नवेड्या भामट्याचा पर्दाफाश! ४ नावे, २५ पेक्षा अधिक महिला आणि कोट्यवधींची फसवणूक; आरोपीला अटक

मिरा रोड आणि भाईंदर परिसरात मॅट्रिमोनी साईटवरून २५ पेक्षा अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या अनुजकुमार त्रिवेदी या भामट्याला वसई-विरार गुन्हे शाखेने ग्रेटर नोएडातून अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 12, 2026 | 05:37 PM
लग्नवेड्या भामट्याचा पर्दाफाश! ४ नावे, २५ पेक्षा अधिक महिला आणि कोट्यवधींची फसवणूक (Photo Credit- X)

लग्नवेड्या भामट्याचा पर्दाफाश! ४ नावे, २५ पेक्षा अधिक महिला आणि कोट्यवधींची फसवणूक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • लग्नवेड्या भामट्याचा पर्दाफाश!
  • ४ नावे, २५ पेक्षा अधिक महिला आणि कोट्यवधींची फसवणूक
  • आरोपीला अटक
भाईंदर : विवाहासाठी इच्छुक असलेल्या घटस्फोटित, दिव्यांग आणि असहाय महिलांना प्रेम व लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ ने अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपीने तब्बल चार वेगवेगळ्या नावांनी देशभरातील २५ हून अधिक महिलांना जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे असून तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद गुप्ता या बनावट नावांचा वापर करत होता. वृत्तपत्रांतील विवाह जाहिराती तसेच मॅट्रिमोनी संकेतस्थळांवर खोटी प्रोफाइल तयार करून तो महिलांशी संपर्क साधत असे. त्यानंतर प्रेमसंबंध व विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि मालमत्ता लाटण्याचा त्याचा धंदाच बनला होता.

या प्रकरणाचा उलगडा मिरा रोड येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे झाला. तक्रारदार महिलेने मार्च २०१९ मध्ये वृत्तपत्रातील जाहिरात पाहून आपल्या मुलीच्या विवाहासाठी आरोपीशी संपर्क साधला होता. आरोपीने स्वतःची ओळख अजय अग्रवाल अशी करून दिली आणि पीडित मुलीसोबत विवाह केला. विवाहानंतर लखनऊ येथे फ्लॅट घेऊन देण्याचे तसेच दोन मजली घर बांधून देण्याचे आमिष दाखवत त्याने तक्रारदार कुटुंबाला मिरा रोड येथील राहता फ्लॅट विकण्यास भाग पाडले.

यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत टप्प्याटप्प्याने तब्बल ८२ लाख रुपये उकळले. फेब्रुवारी २०२२ मध्ये नातेवाईकांच्या लग्नाचे कारण सांगून त्याने पीडित महिलेला दिल्लीला नेले. दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तिचे ३३ तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे घेतले आणि तिला मुंबईच्या रेल्वेत बसवून स्वतः फरार झाला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करून संपर्क तोडला. या प्रकारात संबंधित कुटुंबाची एकूण ९७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि विश्वासघाताच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ ने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी नाव बदलून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने २४ मे २०२६ रोजी ग्रेटर नोएडा येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

अटकेदरम्यान आरोपीकडून जयप्रकाश गुप्ता या नावाचे बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन, राधा गुप्ता या नावाचे एटीएम कार्ड तसेच फसवणुकीच्या पैशांतून खरेदी करण्यात आलेली सुमारे २० लाख रुपये किंमतीची बीएमडब्ल्यू एक्स-१ कार जप्त करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीने अजय संतोष सिंग या नावाने अमरावती येथील एका महिलेशी विवाह करून तिची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.

तसेच, आरोपीने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये अंदाजे २५ पेक्षा अधिक दिव्यांग, मतिमंद, घटस्फोटित आणि असहाय महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण फसवणूक रॅकेटमध्ये आरोपीचा २७ वर्षीय मुलगा अविरल उर्फ प्रखर अनुजकुमार त्रिवेदी याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो बनावट कागदपत्रे तयार करणे, महिलांशी संपर्क साधणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करत असल्याचे तपासात समोर आले असून त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

आरोपीने पहिले लग्न अस्तित्वात असताना ती माहिती लपवून दुसरे लग्न केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील गुन्ह्यात आणखी कलमांची भर घालण्यात आली असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याकडून आणखी अनेक फसवणुकीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

Web Title: Mira road matrimony fraud vasai virar crime branch arrests serial conman from greater noida

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार
1

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
3

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…
4

50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.