Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Police : पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून मुंबईत सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब, स्पा आणि इतर मनोरंजन आस्थापनांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असल्याची चर्चा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 06:15 PM
पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती

पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर
  • पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती
  • अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम
 

सावन वैश्य, नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून २०२६ पासून मुंबई येथील विधान भवनात सुरू होत असल्याने नवी मुंबईतील बार, पब, स्पा तसेच इतर मनोरंजन आस्थापनांवर पुन्हा एकदा पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येते. यंदाही त्याच अनुषंगाने पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर अवैध धंदे, नियमबाह्य व्यवसाय तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा वेग वाढल्याचे दिसून आले आहे. विविध ठिकाणी पोलिसांकडून अचानक तपासण्या, कागदपत्रांची पडताळणी आणि परवान्यांच्या अटींची तपासणी केली जात आहे.

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…

अधिवेशनाच्या काळात विशेषतः डान्सबार हे अनेकदा विधानसभेत चर्चेचा विषय ठरत आले आहेत. नवी मुंबईतील काही डान्सबारांबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे अधिवेशन सुरू होताच संबंधित विभागांकडून या आस्थापनांवर अधिक बारीक लक्ष ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार व्यवसाय सुरू ठेवला जातो की नाही, परवान्याच्या अटींचे पालन होते का, तसेच कोणतेही बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत का, याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बार व्यावसायिकांमध्ये मात्र याबाबत चिंतेचे वातावरण आहे. अधिवेशनाच्या काळात पोलिसांकडून वारंवार तपासण्या आणि वेळेच्या नियमांचे कठोर पालन करण्यात येत असल्याने व्यवसायावर परिणाम होतो, अशी भावना काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे नागरिकांनी अशा कारवाईचे स्वागत केले असून नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना कोणतीही अडचण येऊ नये, मात्र अवैध प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी मुंबईचे नाव दरवेळी डान्सबार किंवा नियमभंगाच्या घटनांमुळे चर्चेत येऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि अधिवेशनाच्या काळात कोणत्या प्रकारच्या कारवाया केल्या जातात, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत पोलिसांची तपासणी मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, बार, पब, स्पा आणि इतर संबंधित आस्थापनांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ratnagiri News: गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखा साठा? खेडमध्ये कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ

Web Title: Monsoon session 2026 navi mumbai bars pubs spas police surveillance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.