Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात ८ एप्रिल रोजी नाल्यात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाने परिसर हादरला होता. डोक्यात दगड मारून निर्घृण खून केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2026 | 08:12 AM
धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा

धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा

Follow Us
Follow Us:

हिंगोली : जिच्या कुशीत जन्म घेतला, जिच्या मायेच्या सावलीत वाढला, त्याच लेकरासाठी आईच वैरीण ठरावी, अशी संतापजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना सेनगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधास आड येणाऱ्या स्वतःच्या मुलाचा काटा काढण्यासाठी मातेनेच कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सचिन रामकिशन राजगुरू (वय २८, रा. वढव, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे मयताचे नाव असून, याप्रकरणी आई ललिताबाई राजगुरू (वय ५५), प्रियकर रामदास तनपुरे (वय ६५) आणि साथीदार नरेश पवार (सर्व रा. वढव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात ८ एप्रिल रोजी नाल्यात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाने परिसर हादरला होता. डोक्यात दगड मारून निर्घृण खून केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

दरम्यान, सोशल मीडियाच्या आधारे मृताची ओळख पटली असून, सचिन असे नाव आहे. चौकशीत उघड झालेले सत्य अंगावर काटा आणणारे होते. सचिनची आई ललिताबाई हिचे रामदास याच्यासोबत अनैतिक संबंध होते.

48 तासांत खुनाचा उलगडा

जामदया येथील खून प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या संदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तपास पथकाने जलद आणि अचूक कामगिरी केल्यामुळे संबंधित तपास अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डोक्यात दगड घालून खून; मृतदेह फेकला नाल्यात

मुलगा सचिनचा ललिताबाई आणि रामदास यांच्या या अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने तोच त्यांच्या डोळ्यांतील काटा बनला. अखेर त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट आरोपींकडून रचण्यात आला. कटानुसार सचिनला पाहुण्यांकडे जाण्याचे आमिष दाखवून सोबत नेण्यात आले. साखरा येथे त्याला दारू पाजून बेसावध केले आणि जामदया शिवारात नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा निर्दयी खून करण्यात आला. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकण्यात आला.

तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कटात सहभागी असलेल्या सदर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आईच्या मायेचे रूप घेऊनच मृत्यू देणारी ही ‘वैरीण’ माणुसकीलाच काळिमा फासणारी ठरली असून या घटनेने संपूर्ण समाज सुन्न झाला आहे.

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Web Title: Mother murders her own son incident in hingoli due to illicit affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • crime news
  • Hingoli Crime
  • Hingoli News

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.