Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

३० ऑगस्टच्या रात्री घरातून अचानक बेपत्ता झालेला तरुण दोन दिवसांनी तळ्यात मृतावस्थेत आढळला. हात-पाय बांधलेले आणि पायाला दगड बांधलेला मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला; तपासात हत्येचे गूढ उलगडले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 10:48 AM
Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • तरुणाची निर्घृण हत्या
  • पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात
  • लुटमारीसाठी हत्येचा कट
 

पुणे: लुटमारीच्या उद्देशाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यात समोर आला आहे. दुधाळे वस्ती येथून बेपत्ता झालेल्या महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, मूळ रा. छत्तीसगड) या तरुणाचा मृतदेह लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात आढळून आला. या प्रकरणाचा तपास करत बावधन पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महेंद्रकुमार बंजारे हा दुधाळे वस्ती येथे राहत होता. ३० ऑगस्टच्या रात्री तो अचानक घरातून बेपत्ता झाला. तो घरी परत न आल्याने त्याच्या २२ वर्षीय पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे हात-पाय टी-शर्टच्या सहाय्याने बांधलेले असल्याचे दिसून आले. तसेच मृतदेह पाण्यावर तरंगू नये, यासाठी पायाला वजनदार दगड बांधण्यात आला होता. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय बळावला.

लुटमारीच्या उद्देशाने हत्या

पोलिसांनी तपासाची दिशा बदलून आरोपींचा शोध सुरू केला. तपासात लुटमारीच्या उद्देशाने महेंद्रकुमार याचा खून केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गोपाल ऊर्फ राज साधन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, दिल्ली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी लुटमारीच्या उद्देशाने महेंद्रकुमारला लक्ष्य केले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो तळ्यात फेकण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये आणि तो पाण्यावर तरंगू नये, यासाठी हात-पाय बांधून पायाला दगड बांधण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा: Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत 

१९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणातील लुटीची रक्कम जप्त करणे, गुन्ह्यात वापरलेली साधने शोधणे तसेच हत्येतील अन्य आरोपीची भूमिका स्पष्ट करणे बाकी असल्याने पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी गोपाल बिस्वास याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्याबरोबरच हत्येचे नेमके कारण, लुटीची रक्कम आणि गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास बावधन पोलीस करीत आहेत.

Web Title: Mulshi youth murder body thrown lake robbery bavdhan pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • maharashtra. pune crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
1

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…
2

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार
4

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.