Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakup मुळे संतापलेल्या प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला, नंतर स्वतःचा गळा चिरला 

ब्रेकअपमुळे संतापलेल्या एका प्रियकराने एक्स प्रेयसीचा पाठलाग केला, तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले आणि नंतर स्वतःचा गळा चिरला. मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2025 | 06:03 PM
Breakup मुळे संतापलेल्या प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला, नंतर स्वतःचा गळा चिरला (फोटो सौजन्य-X)

Breakup मुळे संतापलेल्या प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला, नंतर स्वतःचा गळा चिरला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणाने 24 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला
  • हल्ला करणारा तरुण हा त्या तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड
  • दिवसाढवळ्या या तरुणीवर क्रूर हल्ला
 

Mumbai Crime News Marathi:  नातं तोडायला दोन मिनिटंही लागत नाही, पण तेच नातं जोडायला बराच वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रेम करणं तसं सोप्प आहे. पण ते निभावणं तितकीच कठीण.. प्रेमात जोडीदाराकडून छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मन दुखणे सामान्य आहे. परंतु काहीवेळा समस्या इतकी गंभीर होते की, एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे.  एका प्रियकराने त्याच्या एक्स प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे दहा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. पीडिता बेरोजगार होती, त्याने तिची हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा चिरला.

नेमकं प्रकरण काय?

लालबाग काळाचौकी परिसरात प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्यामुळे संतापलेल्या २४ वर्षीय बेरोजगार आरोपीने हत्येचा मार्ग अवलंबला. आरोपी तरुणाने तरुणीला रस्त्यात बेदम मारहाण केली, त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ही तरुणी स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या आस्था नर्सिग होममध्ये शिरली. तरुणाने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि नंतर स्वतःचा गळा चिरला. या घटनेनंतर या दोघांना तात्काळ केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

ही घटना शुक्रवारी सकाळी लालबागच्या चिंचपोकळी परिसरात घडली.आरोपीने चाकूने वार करण्याच्या उद्देशाने महिलेचा दूरवरून पाठलाग केला. त्यानंतर त्याने तिला प्रसूती रुग्णालयासमोर पकडले आणि तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू बरई याचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय मनीषा यादव ही एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. काळाचौकी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना सकाळी १०:३० च्या सुमारास चिंचपोकळीजवळील दत्ताराम लाड मार्गावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि महिला काळाचौकी पोलीस स्टेशनहून चिंचपोकळी स्टेशनकडे चालत जात होते. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, त्या पुरूषाने अचानक रस्त्यावर महिलेवर चाकूने हल्ला केला. तिचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात, ती महिला जवळच्या नर्सिंग होममध्ये पळून गेली. हल्लेखोर तिच्या मागे आत गेला आणि तिच्यावर अनेक वार केले. स्थानिक आणि नर्सिंग होम कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पुरूषाने स्वतःवर चाकू फिरवला आणि त्याचा गळा कापला.

दोघांनाही उपचारासाठी तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर काळाचौकी पोलीस आणि पोलिस उपायुक्त (झोन ४) आर. रागसुधा घटनास्थळी पोहोचले. केईएम रुग्णालयात पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये

एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, दोघेही बऱ्याच  काळापासून रिलेशनशिपमध्ये होते, परंतु अलीकडेच त्यांचे नाते तुटले कारण आरोपीला मुलीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंधी असल्याचा संशय होता. शुक्रवारी, आरोपीने मुलीला जवळच भेटण्यासाठी बोलावले होते, त्यावेळी वाद झाला आणि त्याने तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

Nilesh Ghaywal : निलेश घायवळला मोठा दणका, पासपोर्ट अखेर केला रद्द; आता परदेशातून…

Web Title: Mumbai 24 year old woman attacked by ex boyfriend in kalachowki and ends life after

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
1

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा
2

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू
3

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?
4

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.