
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
भिवंडी: भिवंडीत एक संतापजनक आणि धक्कदायक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ठार मारल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत घडली आहे.
स्वस्तात कार खरेदीच्या नादात तरुणाला दोन लाखांचा गंडा; कागदपत्रे न देताच व्यवहार केला अन् नंतर…
अंगावरील सोने जशाच तसे
६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हा प्रकार कुटुंबायांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी शेतावर धाव घेतली. त्यावेळेस वृद्ध महिलाही निपचित पडली होती. ही बाब स्थानिक गणेशपुरी पोलिसांना कळवण्यात आली. गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले. विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हे चोरीला गेले नव्हते. म्हणून ही हत्या चोरीच्या उद्देशाने नसून त्या महिलेवर अत्याचार करून ओळख लपविण्यासाठी केला असल्याचा आरोप कुटुंबायांनी केला आहे.
पोलीस तपास सुरु
हत्येच्या घटनेननंतर त्या परिसरातून तीन जणांना पलायन करतांना काही जणांनी पाहिले असल्याची माहिती मृत वृद्ध महिलेच्या मुलाने दिली आहे. पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागिरकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त
मुंबई पोलिसांनी सहा अफगाण नागरिकांना अटक केली आहे. ते बनावट कागदपत्रांचा वापर करून मुंबईत राहत होते. चौकशीदरम्यान, ते कोणतेही वैध कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी ही घोषणा केली. सर्व अफगाण नागरिकांची ओळख पटली आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना लवकरच अफगाणिस्तानात पाठवले जाईल.
Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…