
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीडित अबुल रहमानचा वाढदिवस 25 नोव्हेंबर रोजी होता. २४ नोव्हेंबरला तो कॉलेजला गेला नव्हता. म्हणून त्याचा मित्र अयाज मलिक याने रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले. अबुल रहमान जेव्हा पोहोचला तेव्हा मित्रांनी त्याला केक कापण्यासाठी सांगितले. केक कपात असतांना त्याच्यावर आधी अंडी फेकली, नंतर त्याच्यावर दगड फेकण्यात आले. त्याने हे का करत आहेत असे विचारले तेव्हा अशरफ मलिक याने हातातील बाटली त्याच्यावर फेकली. त्यावेळी अबुल रहमानला पेट्रोलचा वास आला “तुम्ही काय करत आहात?” असे म्हणत ओरडला. त्यानंतर त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावण्यात आली आणि आग लागल्यानंतर पाचही आरोपी मित्र तिथून पळून गेले.
गुन्हा दाखल
हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 110 आणि 3(5) अंतर्गत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. हे भयंकर कृत्य या ५ तरुणांनी का केले? या मागे काय उद्देश्य होता? याचा तपास पोलीस करत आहे.
Ans: वाढदिवसाच्या वेळी मित्रांनी अंडी, दगड फेकून त्याच्यावर पेट्रोल टाकून आग लावली.
Ans: सीसीटीव्ही पुराव्यावरून 5 मित्रांना अटक करण्यात आली.
Ans: नागपुरात प्रेम प्रकरणातील वादातून 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.