गांजा कुठे आणि कसा लपवला होता?
आरोपींनी धंतोली येथील श्रीकांत देवते यांच्या घरातील एका खोलीचा वापर “नारळ व्यवसायाचा माल” ठेवण्यासाठी असल्याचे भासवून केला. मात्र प्रत्यक्षात ही खोली गांजाचा साठा व वितरण केंद्र म्हणून वापरली जात होती. आरोपी अधूनमधून या खोलीत राहात, ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही असे वातावरण त्यांनी तयार केले होते.
कारवाई कशी झाली?
सोमवारी मध्यरात्री समीर, सचिन आणि छगन हे तिघेही खोलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पहाटे सापळा रचून पोलिसांनी रेड केली आणि सर्वांना घटनास्थळी ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनीएमएच 40 डीसी 0093 क्रमांकाची बुलेरो पिकअप (किंमत 10 लाख), मोबाईल 45 हजार रुपयांचे,34 किलो गांजा (किंमत 6.72 लाख)
असा एकूण 17 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून गांजा ओडिशातील बल्लंगीर येथून आणला जात असल्याचे निष्पन्न झाले असून आणखी काही पुरवठादार जाळ्यात अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भाजप युवा मोर्चा पदाधिकारी अटक
या कारवाईतील प्रमुख आरोपी समीर राऊत हा नरखेड तालुक्यात ‘शेर भगतसिंग’ नावाने सामाजिक संघटना चालवत होता आणि मोठ्या प्रमाणात युवक त्याच्याशी जोडले गेले होते. तपासात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि डोर्ली भांडवलकरचे सरपंच वैभव दिलीप काळे (28) यांचाही गांजा रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
अटक आरोपींची नावे
Ans: 34 किलो गांजा
Ans: भाजप युवा मोर्चा पदाधिकारीसह 6 जणांना अटक
Ans: ओडिशातील बल्लंगीर येथून






